Saturday, May 5, 2012

आवर्तन

होते एक रान, त्याच्या दूर दूर वाटा
कंच माणिकाचे खण, त्याच्या नादावल्या छटा.

आले वादळ जोमाचे, फांदी फांदीवर घासे
एक ठिणगी सुसाटे, कसे नशिबाचे फासे

रान जळे रान पळे, त्याची सल कोणा कळे
इथे राख तिथे राख, मध्ये झरा भळभळे

त्या राखेतून एक, पक्षी उडे गगनात
पान उडे रान उडेउडे मन तरारत

वाटा दूर दूर जाती. छटा पुन्हा नादावीती 
पुन्हा भरारले रान, झाले आवर्तन पूर्ण

 - संवादिनी

3 comments:

aativas said...

<< झाले आवर्तन पूर्ण >>

हं... तोही एक अटळ टप्पा असतो .. नव्या आवर्तनाची सुरुवात करणारा ...

आता लिहाल नियमित अशी आशा आहे :-)

Yogini said...

mast lihilasy.. :)

niyameet lihit ja na plzzzz

संवादिनी said...

aativas, yogini ani aniket, I will try my level best to write again. I think its time to write again :)

- shama