Saturday, October 27, 2007

मी आणि केक

लिखाणाला सुरुवात करेन करेन म्हणून बरेच दिवस गेले. आज योग जुळून आला. आजपासून हा ब्लॉग लिहायला सुरुवात करत आहे. खरंतर मला फारसं मराठीतून लिहिता येत नाही. हे आपलं उगीचच म्हणायचं, कारण मला कोणत्याच भाषेत लिहिता येत नाही.

पण मग एक गरज आहे, मन मोकळं करण्याची. काही गोष्टी आपण कोणालाच सांगू शकत नाही की नाही. म्हणजे आई वडील, मित्र मैत्रिणी, ह्यांना आपण एका मर्यदेपर्यंत आपल्या विश्वात येऊ देतो. त्यापुढे? त्यापुढे आपल्या शिवाय कोणीच पोहोचू शकत नाही. मनाचे काही कप्पे नेहेमी सील केलेले असतात. का? कारणं अनेक असू शकतील आणि प्रत्येकाची वेगवेगळीही असतील. काही सांगण्यासारखी असतील काही सांगण्यासारखी नसतीलही.

म्हणजे बघा, सांगायचं तर आहे, लोकांनी ऐकावं असंही वाटतंय, पण माझी गोष्ट, माझीच म्हणून मलाच सांगायची नाही आहे. कुणीतरी दुसरीने माझी गोष्ट ओरडून सांगितली, तर गोष्ट सांगितली गेल्याचं समधान तर मिळेलच आणि ती माझी गोष्ट आहे हे गुपीतही तसंच राहील. थोर लोकं इंग्रजीत म्हणतात, you cannot have your cake and eat it to. But I guess I can. म्हणून हा ब्लॉगप्रपंच.

आता माझी गोष्ट म्हणजे काही मर्लिन मन्रो किंवा मधुबालाची गोष्ट नाही. माझी गोष्ट आहे एका girl next door ची. आज ही गोष्ट सुरू होते आणि मला इथे लिहायचा कंटाळा आला की संपेल. त्यात काही spell bound and breathless असेलच असं नाही. पण जे काय असेल ते खरं खुरं असेल म्हणजे naked truth की काय म्हणतात ना तसं. अगदी मनातलं.

कारण,

I can have my cake and eat it too...


- संवादिनी

5 comments:

Anamika Joshi said...
This comment has been removed by the author.
Anonymous said...

abhinandan, ani marathi blogwishwachya santhh raNadhumaLit swaagat!

Anonymous said...

Surwaat tar chhan zhaliye. roj regularly lihit jaa

tAutomation said...

छान सुरूवात !
Best Luck for Future writing

AV
http://mianimazatv.blogspot.com/

संपदा कोल्हटकर said...

नमस्कार , आत्ताच तुमचा हा ब्लॉग older posts करत करत वाचून संपवला. खूपच आवडला . विशेषत: ज्या खुलेपणाने कोणताही आडपडदा न ठेवता अत्यंत सध्या भाषेत लिहिला आहे त्याचे खूपच कौतुक वाटले . अनेक घटना माझ्यासमोर घडत आहेत असे वाटले . तुमचे लिखाण असेच चालू राहावे आणि आम्हाला वाचायला मिळावे हीच इच्छा !

धन्यवाद