Thursday, March 13, 2008

मी, वाढदिवस आणि आई

आईचा वाढदिवस झाला. मला माझा स्वतःचा वाढदिवस साजरा केलेला अजिबात आवडत नाही. पण इतरांचा मात्र मनापासून आवडतो. आपण असं सेंटर ऑफ अटेन्शन झालेलं मला नाही आवडतं. आणि माझा वाढदिवस हे एक प्रकारचं खाजगी प्रकरण आहे असंच मला वाटतं. अर्थात मी जे फंडे माझ्या वाढदिवसाला लावते ते दुसऱ्यांच्या वाढदिवसाला लावत नाही. म्हणूनच घरातल्या बाकी तिघांचेही वाढदिवस जोरात साजरे व्हावेत असं मला मनापासून वाटतं.

तसा आईच्या वाढदिवसालासुद्धा. तिला गिफ्ट काय द्यायचं, इथपासून साजरा कसा करायचा इथपर्यंत, सगळ्या तयाऱ्या गेले काही दिवस चालू होत्या अर्थात तिला थांगपत्ता न लागू देता. सुटीच्या वारी वाढदिवस असल्याने बरंच होतं.

सगळं काही प्लॅनप्रमाणे सुरू झालं म्हणजे सकाळी लवकर उठून विन्याने चहा करायचा आणि मग आईला उठवायचं. चहा त्याने केला, पण तो करताना मला दहा वेळा उठवून पंधरा प्रश्न विचारले. आणि वाढदिवसाचं सार्वजनिक कार्य असल्याने नेहमीप्रमाणे मला त्याच्यावर उचकता आलं नाही. अर्थात मी काही चहा एक्स्पर्ट नव्हे. पण त्याच्यापेक्षा मी दहा पंधरा कप जास्तच बनवले असतील म्हणून माझा सल्ला. आयता चहा झकासंच होतो तसा विनयचाही झाला. मग बाबांनी त्यांच्या जेपी स्टाइलमध्ये जाहीर केलं की आज आईला स्वैपाकघरात बंदी.

सुटीच्या दिवशी सकाळी पेपरसाठी आमच्या घरात शब्दशः मारामारी होते पण आज नाही. मी स्वतःहून जाऊन तिला हवा तो पेपर घेऊ दिला. तिने मराठी पेपर घेतला. डी.एन.ए. च्या झकपक आफ्टर अवर्स पुरवण्या विन्याकडे सरकवून मला उरलेला पेपर मिळाला. इंग्रजी पेपर वाचायला मला आवडत नाही. पण आज कुणाला काही सांगायची सोय होती का?

बाबांनी पोह्यांचा घाट घातला होता. मी त्यांना आडून आडून फ्रेंच टोस्ट किंवा ऑम्लेट किंवा तत्सम सोपे पदार्थ करायचा सल्ला दिला होता पण तो त्यांनी धुडकावला. रुचिरात बघून कांदे पोहे कुणी केलेले तुम्ही ऐकलेत. बाबांनी केले. आणि ते सपशेल फसले. अर्धे जळून पातेल्यालाच चिकटले. आणि आईला आज स्वैपाकघरात बंदी. मग सगळी निस्तरपट्टी माझ्या वाट्याला लागली. बाबा जाऊन चक्क स्कूटरवरून जाऊन इडली घेऊन आले.

दुपारची महत्त्वाची जबाबदारी माझी होती. ती म्हणजे स्वैपाकाची. माझ्यासारखी बल्लवाचारीण असल्यावर काय बनवायचं हा मोठा प्रश्न. कारण जे बनेल ते खाता आलं पाहिजे, बनवायला एकदम सोपं हवं आणि नंतरची निस्तरपट्टी कमीत कमी हवी. ह्या सगळ्या अटी पाळत पाळत शेवटी पावभाजी ठरली. तरी हा दुपारी जेवायला खायचा पदार्थ नाही, असा मोडता विन्याने घातलाच. माझी स्वस्तात सुटका झालेली त्याला कधीच पाहवत नाही. पण शेवटी, प्रॉपर जेवायचे पदार्थ फेल जाण्याची शक्यता लक्षात घेऊन बाबांनी मला पाठिंबा दिला. पावभाजी झकास झाली. थोडी तिखट झाली. त्यामुळे पाण्याबरोबर खावी लागली. मला खूप आवडली. आईला माहीत नाही आवडली का. पण ती म्हणाली तरी, नाक पुसत पुसत.

संध्याकाळी मी आई बाबांसाठी पिक्चरची तिकिटं काढली. ती दोघं तिथं गेली. विन्या क्रिकेट खेळायला (बाबांच्या शब्दात उकिरडा फुंकायला) गेला. मग घरात काय आम्ही दोघंच मी, और मेरी तनहाई. मग काय? जश्या अक्सर करतो, तश्या आम्ही बाते करीत बसलो.

एक दिवस आई किचनमध्ये नाही तर किती गोंधळ उडाला. गोष्टी चुकत नाहीत तोपर्यंत त्या बरोबर चालल्यात हे कळतंच नाही. किती कष्ट आहेत किचन सांभाळण्यात? अशा दिवशीच ते कळतं. वळेल तेव्हा खरं.

वाटलं जेवढं ती माझ्यासाठी करते तेवढं मी तिच्यासाठी करते का? तिचं ऐकते का? तिच्या बोलण्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष का करते? मग फोटो काढून बसले जुने. एक आई बाबांचा तरुणपणाचा फोटो आहे. मी अगदी पाच सहा वर्षांची असेन तेव्हा. खूप आवडतो मला. आईच्या डोळ्यात जिद्द दिसते एक. संसार उभा करायची. पिचून गेली असेल का ही जिद्द आमचं करता करता?

मग जुन्या आठवणी डोळ्यासमोर येत गेल्या. मला शाळेत घेऊन जाणारी आई. इतर मुलांच्या आया मधल्या सुट्टीत येतात, पण माझी आई नाही म्हणून तिच्याकडे रडणारी मी. माझ्यासाठी कुणाशीतरी भांडणारी आणि भांडण्याचा मुळात पिंडच नसल्याने डोळ्यात आलेलं पाणी लपवणारी आई, अभ्यास घेणारी आई, ओरडणारी आई, माझ्याशी भांडणारी आई. असे काही विचार आले की एकदम रडायला येतं. लाटांवर लाटा येत राहतात अगदी भरती ओसरेपर्यंत.

अगदी तारे झमीन पर मधल्या इशान सारखं...

मै कभी बतलाता नही, पर अंधेरेसे डरता हूं मै मा.
युं तो मै, दिखलाता नही, पर तेरी परवाह करता हूं मै मा.

तुझे सब है पता है ना मा. मेरी मां....

मग रात्री आई बाबा आल्यावर, मी आईला, खास कुणालाही न सांगता आणलेली भेट दिली. एक कॅन्व्हासची वही आणि स्केचींगची पेन्सिल. तिची चित्रकला खूप छान आहे. पण कुठे हरवून बसली कोण जाणे? ती देणगी दादांची. दादा म्हणजे आईचे बाबा. अप्रतिम चित्र काढायचे. तिला सांगितलं की चित्र काढ. मनात असेल ते काढ. खूप आनंद झाला तिला. मनापासून.

एकंदरीत वाढदिवस जोरात साजरा झाला.


- संवादिनी

15 comments:

Anonymous said...

Khup chhan lekh aahe..
rather lekh asa nahis..
ya gappa khup jawalchya aahet..!!

Meghana Bhuskute said...

नेहमीप्रमाणे मस्त. किती साधं आणि सुरेख.. कीप इट अप यार.

HAREKRISHNAJI said...

Please wish her beleted happy birthday on my behalf.

and one small unasked advice better learn cooking fast.

HAREKRISHNAJI said...

When my father retired he was depressed for some time, I also presented him Skatebook and colours. same case. He is a good artist but was completely out of touch

Jaswandi said...

wow! sahich!!
aai bharapurr khush zali asel na?

aai nehemi gharatlya bakichyahche vadhdiwas sajare karayla diwasbhar kama karate.. tichya vadhdiwala jastitjast sandhyakali hotelat jana hota! pan hyaveli mi tuzyasarkha kahi karaycha nakki prayatn karen mhanatye...

kalavinch prayatn succeful zala tar!

Bhagyashree said...

कसलं लिहीलयस.. मला माझ्या आईची आठवण आली.. :((( मी पण असे वाढदिवस साजरे करून पाहयचा प्रयत्न केला होता १-२ वेळा.. पण नाही जमलं.. आता स्वतःला संसार सांभाळायची वेळ आल्यावर तर फारच आईची आठवण येते.. कसं सगळं मॅनेज करतात आया देव जाणे.. असं वाटत, घरी असताना जरा आईला मदत केली असती तर बरं झालं असतं.. आता गेला चान्स..
असो... फार छान लिहीलयस..बाय द वे.. तुझं नविन पोस्ट दिसलं की कायम मला शिर्षक काय असेल याची उत्सुकता असते.. ते ’आणि’ भारी आहे... असंच कंटीन्यु कर.. :)

Abhijit Bathe said...

गंमत म्हणजे काल ऑफिसला येताना हेच गाणं ऐकत आलो होतो - त्यामुळे पोस्ट जरा जास्तच ’भिडलं’!

a Sane man said...

काय बोलू..किती छान वाटलं हे तुझ्या एवढ्या सहज नि साध्या शब्दांत मला जमत नाही.

keep it up!

स्नेहा said...

sahich ga avadal tujh sagala blogach sahii aahe...:)asach lihit jaa.. :)

राहुल फाटक said...

छान लिहीलं आहेस ! ते गाणं.....

SamvedG said...

शक्य असेल तर एक लिंबु-मिर्चीचा फोटो काढ आणि तुझ्या ब्लॉगच्या कोपरयावर डकव. दृष्ट नको लागायला कुणाची

संवादिनी said...

@ एनॉनिमस - लेख लिहिण्याइतपत माझी पोच नाही. जसं आपण दुसऱ्याशी बोलतो, तसं मात्र लिहू शकते. तसं लिहिते. उद्या एखादा विषय बिषय घेऊन लिहायचं म्हटलं तर अजिबात जमणार नाही. खूप बडबडी असण्याचा हा फायदा म्हणायचा का?

@ मेघना, सेन मॅन, स्नेहा, राहूल - थँक्स.

@ हरेकृष्णाजी - तिच्या वतीने माझ्या कडून धन्यवाद. आणि तुमच्या सल्ल्याबद्दलही. शिकण्याचे प्रयत्न चालू आहेत. किंबहुना शिकवण्याचे प्रयत्न चालू आहेत. पण शिष्याच मुळात मंद असल्याने अजून अपेक्षित यश नाही. आईनेही एकही चित्र त्यात अजून काढलं नाहीये. माझ्या आत्येबहिणीला गिफ्ट म्हणून देऊन टाकली नाही ती वही म्हणजे मिळवली.

तुम्ही माझं गाणं ऐकूनही, संवादिनी नावाच्या कुणाचं गाणं ऐकलं नसल्याची शक्यता आहे. कारण हे माझं पेन नेम आहे.

@ जास्वंदी - आई नेहेमी खूशच असते गं. वाढदिवस दणक्यात करा नाहीतर विसरा. कसं काय जमतं आई लोकांना?

@ भाग्यश्री - अगं दर वेळी शीर्षक काय द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. मग कशीतरी ही आणि ची पद्धत रूढ झाली. मला आवडतेय. तुलाही आवडतेय हे बघून बरं वाटलं.

@ अभिजित - अरे काय सही आहे हे गाणं. मला तर रडायलाच येतं ऐकताना.

@ संवेद - मला हसायलाच आलं तुझी कमेंट वाचून. दृष्ट कुणाची लागतेय? सगळे तर हितचिंतकच आहेत. लागली तर माझीच लागू शकेल. कारण माझं डोकं कधी फिरेल आणि मी कधी कंटाळा करायला सुरुवात करेन लिहायचा हे सांगता येत नाही.

cargopilot said...

छान लिहितेस. keep it up !
-पंकज

संदीप चित्रे said...

tumachaa blog khoop chhan aahe... keep up the good work !

snigdha said...

apan olakahat nahi 1mekana.pan ha tumacha pahilach blog jo me wachala,manala bhidnara hota ekdam.dainandin ayushyat apan aaila kiti gruhit dharato yachi jaaneev punha 1da prakarshane zali.ata he je kalala aahe te valawun ghyayacha prayatna karate