Thursday, May 29, 2008

आनंदीआनंद आणि मी

मैत्री कशी, कुठे, कुणाशी व्हावी काय सांगता येतंय? पुण्यामध्ये आले तेव्हा मित्र कॅटेगरीमध्ये असणारी एकही व्यक्ती नव्हती. आल्यापासून शोधत होते मैत्र. पण ती काय चण्याची डाळ आहे की गेले किराणा दुकानात आणि घेतली एक किलो? तसंच माझं झालं. शोधत राहिलं की मिळत नाही आणि ध्यानीमनी नसताना अलगद पदरी पडतं.

आगाऊपणे मला बंगाली का? म्हणून विचारणारा तो. तो नको, फारच रुक्ष वाटेल सतत तो म्हटलं तर. एखादं छानसं नावच देऊन टाकूया त्याला इथल्यापुरतं. काय बरं? हं, आनंद म्हणूया. तर मला हा आनंद भेटला. मुंबईचा, मराठी आणि मराठीत बोलायची अजिबात लाज न वाटणारा. मग झालीच की मैत्री. ह्याला म्हणायचं काखेत कळसा आणि गावाला वळसा. बरं माझ्या समोरच बसतो तो. म्हणजे मध्ये क्यूबिकलची भिंत आणि पलीकडे तो. पण कळलाच नाही मला तो. भिंती, कमी असलेली अंतरं किती वाढवून टाकतात ना?

कंपनी असली आणि ती चांगली असली तर किती बरं वाटतं ना? नाहीतर एकटीने जा चहाला, सहसा एकटी नाहीच पण इतरांच्याबरोबर गेलं तरी मला एकटंच वाटायचं. आपल्याला नाही ब्वा रस, नव्या टेक्नॉलॉजीच्या गप्पा ठोकण्यात. त्यापेक्षा मस्त एखाद्या पुस्तकावर बोलावं. झालंच तर गाणं आहे, कविता आहेत. त्यामुळे माझं आणि आनंदचं जमतं. तो अजिबात कामाबद्दल बोलत नाही. स्वतः कलाकार आहे असं नाही, पण आवड आहे. विचारत राहतो, हे कसं करता, ते कसं करता, पडदा कसा पडतो, विंग कशाला असतात. फुटकळ प्रश्न, पण मला माझ्या कंफर्ट झोनमध्ये असल्यासारखं वाटतं.

आणि बरं मुंबईचा आहे, पण पुणं सगळं पाठ आहे. मग काय सध्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हादडणे आणि भटकणे हा कार्यक्रम चाललाय. परवाच आम्ही वैशाली मध्ये गेलो. मस्त आहे हं. म्हणजे मुंबईच्या दही बटाटा पुरीची चव नाही त्या एसपीडीपीला पण हेही नसे थोडके. अजून दोनतीन ठिकाणी जाऊन आले. युनिव्हर्सिटी खूप छान आहे. ओशो पार्कपण आवडला. घरी टीव्ही नाही. मग करायचं काय? भटका. आता कायनेटिकही आहे. त्यामुळे थोडा उशीर झाला तरी चालतो.

हे झालं ऑफिसमधलं. गेल्या आठवड्यापासून एक नवा उद्योग सुरू केलाय. माझ्या बाबांचे एक मित्र आहेत इथे. सहज बोलत बोलता ते असं म्हणाले की ते सकाळी बॅडमिंटन खेळतात. मी लगेच त्यांना विचारलं मी येऊ का म्हणून? ते म्हणाले जरूर. तिथे जायला सुरवात केलेय. ह्या वेळी मुंबईहून येताना माझी जुनी रॅकेट विथ नवं गटिंग घेऊन आलेय. गेले दोन दिवसतरी रेग्युलर आहे. आता पाहूया किती दिवस चालतं हे फॅड.

माझ्या बाबांचे मित्र म्हणजे माझ्या वयाचं कोणी त्यांच्या बरोबर खेळत नसणारंच. पण पहिल्याच दिवशी त्यांच्या एका मित्राच्या मुलीशी ओळख झाली. तीही रोज खेळते पण ह्या लोकांबरोबर नाही. त्यांचा ग्रुप वेगळा. असली गट्टी जमलेय ना तिच्याशी की सांगायची सोय नाही. म्हणजे आम्ही भेटून दोनच दिवस झालेत असं वाटतंच नाही. काल तिच्या घरी गेले होते. अगदी माझ्या घरीच गेल्यासारखं वाटलं. काका काकू, तिचा भाऊ आणि ती. एकदम घरचीच आठवण झाली. पण आताशा आठवणी येऊन मन उतू जात नाही. आठवण येते तशीच जाते.

तर असे हे माझे दोन नवे मित्र. आनंद, आणि तिला आनंदी म्हणूया. कारण माझ्या लिखाणात नक्कीच ह्या दोघांचा पुन्हा पुन्हा उल्लेख होणारे. नशीब माणसाला कुणा कुणाची भेट घालून देतं बघा. मी कुठे होते? हे दोघं कुठे होते? आम्ही भेटलो कसे? आणि आम्ही एकमेकांचे मित्र झालो कसे? आता त्यांच्या मित्रांशी ओळख होईल, ते माझे मित्र होतील आणि मैत्र वाढत जाईल. कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये हे सगळं प्रोग्रॅम करून ठेवलेलं असतं कोण जाणे.

ऑफिसमध्ये काम नाही, सहज एकदा जीटॉक उघडून बसले होते, तर एका ब्लॉगरने हॅलो केलं, त्याच्याशी थोडा वेळ बोलले तर अजून एका ब्लॉगमैत्रिणीने हॅलो केलं, जितका वेळ ऑनलाईन राहिले तितका वेळ एकेक लोकं भेटत गेले. खूप छान वाटलं. आपण ज्या लोकांचं लेखन वाचतो, त्या लोकांशी बोलताना त्यांचे वेगळे पैलू सापडतात असं वाटलं. वेळ इतका छान जातो. आपण एकटे आहोत ही भावनाच विसरायला होते. हे आणखी एक मैत्र.

मुंबईला ह्या वेळी मुद्दाम सकाळी आमच्या नाना नानी ग्रुपला आणि माझ्या समुद्राला भेटायला गेले. जग्गू नाही भेटले. खरं मला त्यांना खूप सांगायचं होतं, कसं काय झालं पुण्याला आणि मी कसं मॅनेज केलं ते. खूप खूश झाले असते. त्यांना फोन केला. गुडघे दुखतायत म्हणाले. पुढच्या आठवड्यात भेटून येईन. आईलाही जरा बरं नव्हतं. सर्दी खोकला आणि तपासारखं वाटत होतं. पण आता बरंय म्हणाली फोनवर.

एक गोष्ट माझ्या लक्षात यायला लागलेय आताशा की माझी एक्सक्लूसिव्ह विश्व तयार व्हायला लागलीत. मुंबईचं विश्व वेगळं, पुण्याचं वेगळं, पुण्याला ऑफिसचं वेगळं, ऑफिसआधीचं वेगळं, ऑफिस नंतरचं वेगळं, आणि घरी गेल्यावर माझ्या एकटीचं एक अजूनच वेगळं विश्व. पूर्वी ह्या सगळ्यात एक सुसूत्रता होती. पण आता म्हणजे मीच माझ्या वेगवेगळ्या विश्वात वेगवेगळी वागायला लागलेय असं वाटतं. अगदी नाटकातल्यासारखं. प्रसंगाला अनुरूप. कप्पे आहेत हवाबंद. ह्या भागाचा त्या भागाशी संबंध नाही आणि त्याचा ह्याच्याशी.

का?

- संवादिनी

13 comments:

Sneha said...

ya 'ka'ch uttarhi halu halu ulaghadel aga... aani yachyatahi majja yete he janaval aselach... halu halu ang valni padat sagal...
aata ya nataka madye navin patra yet chalalet aajun navin natya nirman honyasathi...
ya kharya khurya natakala aani natakachya navin patranaa hardik shubhecya...


...Sneha

Anonymous said...

Hi,
mi kalpasunch ha blog vachayla survat keli ani aaj sakali officemadhe kam naslyamule alyaver lagech parat open karun vachat hote.
khup chan lihites tu.agdi vachat rahavese vatte.
jevayla jatan site opench hoti alyaver baghte ter ajun ek post.
asech lihit ja bare vatte vachayla.
ani tu lifechya true stories sangte tyamule kharech khup chan vatte.aaj pan chan lihile ahes.
All the best for ur future and waiting for ur new post.

HAREKRISHNAJI said...

रमलात वाटतं आमच्या पुण्यात.

पुढच्या वेळी याल तर जेवायलाच या !
असं कुणी सांगीतल की नाही अजुनपर्यंत ?

Dk said...

संवादिनी, फारच आवडल मला तुझे लिखाण! Blog चा set up पण अगदी छान आहे! (pinkish .. girlish) पण तरीही वेगळा! मग वाटल की profile check करु पण नाव गाव काहीच कळल नाही. असो I hope we will become good net/ chat friends :) Keep it up!
ता. क. (हे जर आगाऊ वाटत असेल तर आगाऊ माफी! :)
दीपक
"Reality is an intensely personal experience..subject to all forms of perceptual biases."

Meghana Bhuskute said...

अशी वेगवेगळी विश्व असण्यात मजा नाही का पण? आपलंच स्क्रिप्ट आपणच लिहायचं. कॅरेक्टरसाठी डिटेलिंग करायचं. इमाने-इतबारे भूमिका रंगवायची. कंटिन्युइटीचं भान राखत. मला तर ब्वॉ धमाल येते. शिवाय सगळ्याच भूमिका. कुणाला फसवतोय-बिसवतोय असं वाटायचाही प्रश्न नाही! इथे मरायला आपल्याला तरी कुठे कळलंय, आपण पडद्यामागे कसे आहोत ते!

आनंदी-आनंद. अफलातून!

Bhagyashree said...

e mastch g! good frnds sapdle lawkar tula! :) badminton khelayla kuthe jata mag.. neways njoy..

btw, label samasya ka mhane!! suit nahi hot farsa..

Anonymous said...

Hmmm... writing once again!!

"गिरगांव" फार थोड्या कालावधीसाठी माझा Weak point झाला होता. म्हणजे तसे वाटत तरी होतं. तुला माहित नव्हत मिशीवाल्या बद्दल पण मला तर सगळच माहित होत तिनेच(** ***) सांगितल!
I hope they will live happillllly!
Well now I think it was a phase of my life & I don't have much time... have to move on!

बाकी तु लिहितेस फारच छान!! ...चार ही कोन समांतर पातळीवर असणे फार मोलाचं असतं जाउदे फार लिहित नाही!

This time i'm commenting as Anonymous coz it is too risky! You may know him/her nywz keep writing ! keep smiling! :)

केसु said...

अगदी माझेच विचार लिहून दाखविले आहेस. पण तू लकी आहेस. तिकडे पुण्यनगारीत तुला मराठी बोलणारी जनता तर मिळाली. मी इकडे अमेरिकेत एकटाच वैतागलोय. अधून मधून मग कोणी कोणी भेटते अणि खुप छान वाटते बोलायला. मग कधी कोणी subway मध्ये काम करणारा intern असो, किंवा मग इंडियन restaurant मध्ये काम करणारे manager असो. पण अस लांब सहवासचा मैत्र्य अजुन नाही मिळाल.

वेगवेगळ्या विश्वा मध्ये वावरताना तू कधी चिडत नाहीस का ग? कितपत easily जमत हे सगळे? म्हणजे, इकडे मी माझ्या मनाप्रमाणे वागू शकत नाही, त्यामूळे वैताग येतो, चिडचिड होते. वाटत या सगळ्या बाह्य विश्वाशी जुळवून घेत आपण आपल्यालाच हरवून तर बसत नाही?

असो, खुप छान लिहितेस। सतत वाचाव अस. शुभेच्छा !

Samved said...

चालु द्या...अजून फ्रेम पुर्ण व्हायची आहे. ती झाली की बोलु

Anonymous said...

Good to know you are settling well in the new place. The beauty of Pune is that its a hop, skip, jump from mumbai. So you can always land up at home whenever you miss your mom's batate-pohe. For me, mumbai is a few continents away, and aai's batate-pohe a few months journey! So consider yourself lucky ;-)

Glad to hear you making friends - they are the best home-improvement kits to convert a new city into home.

Anamika Joshi said...

श्या.. फ़ार घाई केलीस. इतके दिवस स्टोरीचं बेअरिंग मस्त सांभाळलं होतंस. मजा गेली सगळी ह्या एका पोस्टमधे. आनंद आहे सगळा असा उत्स्फ़ूर्त एकच उद्गार निघाला हे वाचून. :-(

संवादिनी said...

@ स्नेहा - हम. तू म्हणतेस ते बरोबर आहे. नवीन पात्र येत आहेत आणि एक वेगळंच नाटक घडत आहे. घडत राहील. आपली भूमिका, जे जे होईल ते ते पाहावे अशीच असलेली बरी.

@ ऍनॉनिमस १ - हाय. माझा ब्लॉग भराभर वाचल्याबद्दल आणि माझं कौतुक केल्याबद्दल मनापासून आभार. अजूनतरी न चुकता दर आठवड्याला लिहितेय. प्रयत्न करते. पण दर आठवड्याला कुठे काय एक्साइटींग घडतं?

@ हरेकृष्णाजी - अहो मला वाटलं तुम्ही आमच्या गावचे आहात? तुम्हीही पुण्याचेच? नाही ब्वा आम्हाला कुणी बोलावलं जेवायला. सगळेच पुणेरी, कुणी कुणाला बोलवायचं?

@ दीपक - धन्यवाद. इ-मैत्री करायला नक्की आवडेल.

@ मेघना - "इथे मरायला आपल्याला तरी कुठे कळलंय, आपण पडद्यामागे कसे आहोत ते!". ये हुवी ना बात. एकदम पटलं. पण हे न कळणंच कधी कधी घोर लावून जातं.

@ भाग्यश्री - समस्याच आहे गं ही. स्वतःचं असणं विरघळताना स्वतः बघणं ही. अर्थात, नवं काय होईल ते चांगलंच होईल असं म्हणूयात.

@ ऍनॉनिमस २ - हं. म्हणणं थोडंसं कळलं. कधी कधी आपण काय बोलतोय हे दुसऱ्याला कळण्यापेक्षा ते बोलणं जास्त महत्त्वाचं असतं. तसं काहीसं होतं ना?

@ केदार - चिडत नाही? अरे हल्ली तर खूप चिडचिड होतेय माझी. असं वाटतं कधी कधी होतं तेच बरं होतं उगाचच नस्तं लोढणं अंगावर घेतलं.

@ संवेद - ? कसली फ्रेम?

@ एसेम - नक्कीच. सो फार आय ऍम कन्सिडरिंग माय्सेल्फ लकी. व्हॉट आय डोंट नो इज इफ अँड व्हेन आय विल रन आऊट ऑफ लक.

@ विदुषी - धन्यवाद. आयुष्य कादंबरीसारखी नसतात ते ह्याचमुळे. कधी कधी एक क्षणात सगळी मजा जाते. कधी कधी अखेरीपर्यंत उत्कंठा कायम राहते. गेल्या ब्लॉगपर्यंत तरी वाचताना मजा आली ना? हेही नसे थोडके. धन्यवाद.

Dk said...

@ ऍनॉनिमस २>> ते बोलणं जास्त महत्त्वाचं >> Not exactly! Timing is really important & the way you talk & the people you choose... After all you can't force anybody not even your emotions, feelings for that person! Even if you try to forget it is not in you hands.... well keep writing & visiting my blog! 