आपल्याला वाटतं आपण एकटे असतो. कुणाचीतरी सोबत असावी असं वाटत असतं. पण ती सोबत खूप खूप दूर आहे हे माहीत असतं. सगळं कसं बेचव, निरस वाटत राहतं.
आणि कसल्या चाव्या फिरतात कोण जाणे?
आले मंजूनाथाच्या मना तेथे कोणाचे चालेना. अचानक वसंत बहरतो, कळ्यांची फुलं होतात, फुलांच्या सुगंधाने आसमंत दरवळतो, सूर्यसुद्धा शीतल वाटायला लागतो, दिवसा चांदण्यांची स्वप्न पडतायत की काय असं वाटायला लागतं. पण ते स्वप्न नसतंच मुळी. आपणंच आपल्या हाताला चिमटा काढून बघतो. आणि दुखलेल्या चिमट्याच्या वळातच आपल्याला सर्वाधिक सूख मिळतं. कारण जे अशक्य वाटत असतं ते घडतं.
ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा?
आता एवढंच. पुढच्या आठवड्यात मुंबईत आले की सविस्तर लिहिणं होईलंच.
8 comments:
मिशीवालं पावनं तिथं भेटलं की काय? ;)
am reminded of another beautiful song,
"aaj kal paav zameen par nahin paDate mere,
bolo dekhaa hai kabhI, tumane mujhe uDate huye.."
have fun in m'lore!
aani mumbai la parat aalyavar saang aamhaala - tikde kaay-kaay jhaala tey ;-)
wow... just can't wait!
ekdam jashn-e-bahara challela distoy manglore madhe...sahiye!
मला या पोस्टला साजेशी कमेंट लिहिता येत नाहिए.
आय मीन - �तुम्हे हो ना हो - हमको तो इतना यकीं है....� पासुन सुरुवात केली पण जमेना.
आणखी कुठली आर्त बिर्त गाणी पण आठवेनात.
तरी इथे लिहायची घाई वगैरे करु नकोस - live life kingsize! :))
सगळे भाईलोग already भिडले आहेतच त्यामुळे मी नुस्तीच गंमत बघतोय झालं :)
आलीस की नाही परत?? ते राव्याचे काही डीटेल्स मिळणार आहेत की नाहीत??? ;-)
शामे गमकी कसम, आज गमगी है हम....
- संवादिनी
Post a Comment