Thursday, September 10, 2009

माझे गाणे

माझे गाणे असले गाणे
माझे गाणे तसले गाणे
गर्वतरूच्या फुलासारखे
तरारलेले एक तराणे

माझे गाणे असले गाणे...

पाऊस बिंडा नादावूनी
पागोळ्यांचा धरतो ताल
मल्हाराच्या गोड गळ्यावर
अभ्राभ्रांची सुरेल शाल

कडकड कडकड कडाडणारी
वीजबाईची तान वेगळी
सरसर सरसर रसरसलेली
पऊसरींची मीण आगळी

गरगर गरगर गोल घुमोनी
मारुतराज समेवर येई
ह्या सगळ्या कल्लोळामागे
माझे गाणे हरवून जाई

माझे गाणे असले गाणे?.....

माझे गाणे कसले गाणे
माझे गाणे असले गाणे
गर्वतरूच्या फुलासारखे
कोमेजून गेलेले कण्हणे

3 comments:

बाबा said...

ताई, छान लिहिलेयस हं. गेल्या वेळी नाही केली कमेंट पण आता नक्की देतो. नुसती कविता लिहून उपयोग नाही बरं का. आपलं रडगाणं महत्त्वाचं असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण कुठेतरी तुला जाणवला तसा दुसऱ्या कशाचातरी मोठेपणा डोळ्यात न मावण्याइतका भरतो आणि मग आपण एकदम खुजे वाटायला लागतो गं. पण म्हणून आपल्या गाण्याला कण्हणंही नाही म्हणायचं. आपली उंची असल्यापेक्षा फुगवूनही सांगू नको आणि दिसल्यापेक्षा कमी आहे म्हणून खट्टू होऊ नकोस.

Deep said...

Hey he pahilich na kavita? chaan aahe! aata tu kaay postnaar naahis ka changlee mothee... ? ;)

jara gyaan de>> अभ्राभ्रांची mhnje kaay? neet kahi samjli nahi :(

संवादिनी said...

@ बाबा - हं. आहे रे लक्षात :)

@ दीप - अभ्राभ्रांची म्हणजे, अभ्र अभ्रांची. पहिला अभ्र रंग म्हणून वापरलाय आणि दुसरा ढग म्हणून. कदाचित चूकही असेल. माहीत नाही.