प्रत्येक प्रश्नाला एखादं उत्तर असलंच पाहिजे का?
माझ्या मते हो. एखद्या प्रश्नाला उत्तरंच नसेल तर तो प्रश्न म्हणवून घ्यायच्या लायकीचाच नाही. असलेलं उत्तर सापडत नसेल तर गोष्ट वेगळी. त्याचा शोध घेण्यात एक मजा आहे. पण प्रश्नाला उत्तर नसेलंच तर त्याची उत्तरं शोधण्यात श्रम वाया घालवून स्वतःला मनस्ताप करून घेण्यात काय मजा आहे?
असाच एक उत्तर नसलेला प्रश्न. आता लग्न का करत नाही?
मुळात माझ्यासाठी हा प्रश्नच नाही. मला जोपर्यंत लग्न करावंसं वाटत नाही तोपर्यंत मी करणार नाही. पण केवळ करिअर च्या दृष्टीने काहीच करण्यासारखं उरलं नाही. नोकरी मिळाली, टिकली, चांगली चाललेय, म्हणून लग्न करणं मला शक्य नाही. पण सांगायचं कुणाला?
काल पुन्हा एकदा एक "चांगलं" स्थळ (आमच्या मातातातांच्या मते) सांगून आलं. म्हणे एकदा बघून घ्यायला काय हरकत आहे? काय बघायचं? मुलाचा चेहरा? त्याच्या आई वडलांचा चेहेरा? त्याचा पगार? शिक्षण? आणि मग काय इक्वेशन्स मांडत बसायचं?
थोडा दिसायला कमी आहे पण पगार चांगला आहे. पासिंग स्कोअर. करून टाका लग्न. किंवा दिसायला स्मार्ट आहे. बोलण्यात जरा कमी वाटतो, पण वडिलओपार्जित पैका आहे. पासिंग स्कोअर, करून टाका लग्न. किंवा मुलगा बोलायला दिसायला छान आहे, शिक्षण कमी आहे. नापास. नका करू लग्न. हे काय X = Y इतकं सोपं गणित आहे का?
काल पुन्हा हाच वाद रंगला. अर्थातच तो आई विरुद्ध मी असा होता. विनू (माझा भाऊ) माझ्या बाजूने आणि JP (बाबा) न्यायाधीश. पण जर आमची आई परवेझ मुशर्रफ असेल तर JP म्हणजे न्यायमूर्ती डेगर. म्हणजे न्यायाची अपेक्षा न केलेलीच बरी.
त्यांचं म्हणणं मी आता लग्न करावं. आमचं म्हणणं मी आताच लग्न करण्याची काहीही गरज नाहीये.
त्यांचं म्हणणं वय वाढत चाललंय. माझं म्हणणं लग्न केलं म्हणून वय वाढायचं थांबणार नाही. त्यांचं म्हणणं वय वाढल्यावर चांगली मुलं मिळणार नाहीत (कारण ती आधीच खपलेली असतात). माझं म्हणणं चांगली म्हणजे काय?
त्यांचं म्हणणं, शिक्षण नोकरी सगळं झालं आता थांबायचं कशाला? माझं म्हणणं इतकी वर्ष शिक्षण झालं, आता नोकरी चालू आहे, पण मला जे करायचं ते मी कधी करणार? नाटक, गाणं. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखी (म्हशीसारखी म्हणा हवं असेल तर) मी गोल गोल फिरतेय. लग्न लावून देऊन मला दुसऱ्या घाण्याला जुंपून घ्यायचं नाहीये. माझ्या पॅशन्स कधी परस्यू करायच्या मी? लग्न झाल्यावर?
बाबांना माझं म्हणणं पटतं. आईलाही पटत असेल. मला खत्री आहे. पण तिच्या पिढीचे संस्कारच असे आहेत की पटून सुद्धा ती पटवून घेऊ शकत नाही. कालही तसंच झालं.
बाबा नंतर मला म्हणाले, विचार कर. तुला घालवून द्यायची नाहीये किंवा तुझा कंटाळाही आला नाहीये. पण काही गोष्टी कधी ना कधी कराव्याच लागतात आणि त्या योग्य वेळी झालेल्याच बऱ्या असतात. मी बरं म्हटलं. आईला जाऊन सॉरी म्हणाले. तिला म्हटलं मला थोडा वेळ दे. ती हो म्हणाली.
आजचं मरण उद्यावर ढकललं.
आता मी लग्न का करत नाही? भांडणापूर्वी माझ्यासाठी प्रश्नही नसलेलं हे वाक्य माझ्या मनात प्रश्नचिन्ह उमटवत राहतं. माझ्याकडे खरंच उत्तर नाही.
मला तिची बाजू कळते पण वळत नाही हेही तितकंच खरं.
मी हा मुद्दा माझ्या सबकॉन्शस माईंड मध्ये डंप करून काहीही होणार नाही. मग नक्की प्रॉब्लेम काय आहे? मला मुलं आवडत नाहीत का? आवडतात. चांगला दिसणारा मुलगा दिसला आणि नजरानजर झाली तर हृदयाची धडधड वाढतेच. किंवा एखाद्या हुशार फ्लुएंट बेलणाऱ्या मुलाशी बोलताना मी आकर्षित होतेच. पण आकर्षण वेगळं, लग्न वेगळं. क्रश असणं वेगळं आणि प्रेम असणं वेगळं.
आणि ह्या लग्न ठरवण्याच्या खेळात तर फार फार तर बघितलेल्या मुलावर क्रश होऊ शकतो. दोन भेटीत प्रेम कसं होईल?
ही भीती आहे का माझ्या मनात? फसलं तर हे सगळं. आईला मी एकदा विचारलं होतं. फसलं तर ठरवलेलं लग्न. ती म्हणाली, माझं (म्हणजे तिचं) काय फसलं? आता ह्यावर काय बोलणार?
बाबांना म्हटलं, बाबा मला अशी भीती वाटते की ठरवलेलं लग्न फसलं तर? ते म्हणाले, तुझं बरोबर आहे. फसू शकतं. पण म्हणून तू जन्मभर लग्नच नाही का करणार? मला म्हणाले तूच शोध तुझा नवरा. तसं झालं तरीही लग्न फसू शकतंच. मग काय करशील? नो रिस्क नो गेन. आणि तुला ही रिस्क कधी ना कधी घ्यावी लागणारंच आहे. मग त्यापासून पळून काय फायदा?
विनय ला विचारलं. तो म्हणाला ताई भंकस नको. इतक्यात काय लग्न. आय विल मिस यू यार. मग मी भांडू कोणाशी? डोळ्यात पाणी आलं माझ्या. मग म्हणाला, चिल! जास्त डोक्याला ताप करून घेऊ नको. मुलगा आवडला, चांगला वाटला तर पुढचा विचार कर. अतापासूनच नेगेटिव्ह राहू नकोस.
विनू भांडला कितीही तरी सल्ला बरोबरच देतो. कधी कधी मोठ्या भावासारखा.
त्याचं मी एकलं आईला सांगितलं की मी मुलाला भेटायला तयार आहे. पण सगळ्या फौजेसह नाही. जसं मी माझ्या एखाद्या मित्राला भेटते तसंच. तो दादरला राहतो. तेव्हा शिवाजी पार्क कट्टा उत्तम. आई खूष, बाबा येऊन मला थॅंक्स म्हणून गेले.
मी एकटीच विचार करीत उभी होते. विन्या आला म्हणाला चिल यार! कमसे कम जिप्सीत डिनर तरी सुटेल ना तुझा? आता ह्याच्याशी माझं भांडण होईल नाहीतर काय?
पण कांदा पोह्यांएवजी जिप्सी नक्कीच वाईट नाही. काय?
तकदीर में जो होगा वो देखा जायेगा.
- संवादिनी
9 comments:
Hi Sanwadini (may be I spelled ur name incorrect)
nyway, mazhya lagnala aaj 3- sade 3 varsha zali pan lagna tharavatana mazhyahi dokyat asach kahitari hota ... :)
ani mala ter ashi samajut ghatali ki kuthe lagech tharanar aahe mhanun ..patrika ,sthalachi pasanti hyala vel lagatoch ...pan he asa mhanun suruvat kelyapasun fakt 15 divasat mazha lagna tharal ani maza jagach badalal purna
pan touchwood mala khupp chhan navara milala ...ani mi khupp sukhi aahe ..
I am sure tula pan chhan sthal milel .. be happy and enjoy this phase of life also .. lagna tharanyashi sagalyanna ashich kahishi bhiti asate ..pan nanter sagal chhan houn jata...
Good luck
आणि मला प्रश्न पडलाय "मी लग्न का केले ? "
आपला बॉग मस्त आहे.
btw - जिप्सीत काय झाले ते जरुर लिहा.
खरंतर तुझ्या पोस्ट चा विषय वेगळाच आहे, पण प्रश्न आणि त्याला चिकटुन आलेलं (किंवा आलंच पाहिजे अशा आग्रहानं आणलेलं) उत्तर - अशी सुरुवात केलीस तेव्हा माझ्या एका पोस्टला माझ्या मित्राने - राहुलने दिलेली प्रतिक्रिया इथे तुला ऐकवावीशी वाटली -
"Prashna asla ki kahitri ardhavat ahe asa ka vatava?
Rather nuste prashna astitvat asu shaktat..
Rather majha asa mhanna ahe ki Prashna ani Uttar swatantra pane astitvat asuch shaktat nave astat..
Apan ugich tyanchi sangad ghalnyacha prayatna karto.
Aplyala shalet ashahi kahi bhukkad goshti shikavlya jatat mhanun...
e.g. Prashna: Tujha Nao kay?
Uttar : Majha nao Rahul.
He donhi vegla kela tari tyala tyacha swatantra artha ahech..
Tujha nao kay ha prashna uttarashivay hi astitvat asu shakto..Ani ..Majha nao rahul he goshta kontyahi prashanvina hi astitvat asu shakte..
Fakta aplyalach donhi chi link lavlyashivay chain padat nahi..
Ani apan tya donhi goshtina chota karun takto..pangla karun takto...
He theory patli ka?"
ओह btw - थियरी पटो ना पटो, पण ती थियरी इथे लावायची म्हटली तर तुमच्या घरात आंधळी कोशिंबिरीचा खेळ सुरु होईल बहुतेक! :))
हा..हा..:) हर लग्नाळू दिल की कहानी लिहीलीयेस तू ह्या पोस्ट मध्ये. पण इतका विचार करून मग योग्य निर्णय घेतलास. जिप्सीतल्या डिनरसाठी गुडलक! भेटीला जाण्याआधी पूर्ण माहिती जाणून घेउन स्थळ भेटण्यालायक आहे नां याची खात्री केलेली बरी. कारण मॅक्स ४/५ स्थळांना भेटल्यावर वैताग येवू शकतो. तेव्हा ती स्थळं कन्सिडर करण्यास वर्थ आहेत नां हे पाहिलेलं बरं! :)
मी अगदीच जे.पी. किंवा मॉमसारखं लेक्चर नाही नां दिलं? :D
फारच छान लेख! मी दोघा-तिघा 'गरजूंना' फॉरवर्ड करतोय:-)
trust me, when i was "looking" for a "suitable" (?) boy, i was scared to death...how do i trust my own judgment? a couple of meetings, maybe false impressions, and i am bound with this person for life? very scary thought. but then, i did not have to face any disaster since i shortly fell in love...and now the know the person whom i m going to marry very well.
nicely written...
let us know what happened over the modern day "kanda-poha" ;)
hello friends (charuta, abhijit X 2, Sarkit, harekrishnaji and anony MOUSE),
Thanks for your comments and wishes as well. Though the wishes did not help me first time around. maybe next time it will be better. Lets see what happens.
Thanks Again
Samvaadini
नमस्कार संवादिनी,
आत्ता तुझा (तुमचा) ब्लॉग वाचत होतो. "प्रश्न उत्तर आणि जिप्सी" हे वाचताना मला वाटत होत कि तु (तुम्ही) हेच माझे विचार आहेत. फ़क्त मि एक मुलगा असल्याने थोडे वेगले असतील पण concept तिच आहे. मला तुझ्या ब्लॉग विषयी एका मित्राने सांगितले आणी आवर्जुन last to first यायला सांगितलय ते का हे आत्ता मला कळतय.
पण छान लिहिलयस. Marathit lihine kiti KATHIN aahe. But ur blog is interesting. I will finish it ASAP.
हर्षल श. नेने
Hi
Tuza blog vachlyavar kharach prashn padla.. kashala me lagn kele.... mazya lagnala 10 mahine zale atta kuthe... pan mala attach hya saglya pasun palun jau shi vatate ahe... suruvatila tyala pahilya var asech vatle hote ..prem, vishwas n janmojnmicha saath etc... pan he sagla bawlat pana ahe... lokanna vatate hila sukh khupte ahe... I m living in foreign country so can't share this even with my friends....
Post a Comment