गेल्या आठवड्यात उगाचंच उदास उदास वाटत होतं. कशामुळे? काही कळलं नाही. कदाचित नव्या वर्षात तो एकदाही दिसला नाही म्हणून असेल. पण त्याच्यामुळे मी उदास व्हायचं काहीच कारण नाही. मग काय झालं?
कदाचित काहीच झालं नाही म्हणून असेल. जेपींनीही मला विचारलं, काही बिनसलंय का म्हणून, जग्गूंनीही विचारलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे विन्यानी सुद्धा विचारलं. बाकी दोघांचं ठीक आहे पण बाळराजे त्यांच्या आत्ममग्नतेतून बाहेर येऊन चक्क माझी चौकशी करतात म्हणजे खासच.
हा बाळराजे शब्द माझा नाही बरं का. नुकतीच मिलिंद बोकिलांची "शाळा" वाचली. अगदी गेल्या रविवारी वाचायला घतली आणि सोमवारी रात्री दोन वाजता संपली. त्यातल्या त्या मुलला त्याची बहीण बाळराजे म्हणते, मला तो शब्द आवडला. उचलला. मुळात ते पुस्तकंच आवडलं. कधी कधी वाटलं शिरोडकर म्हणजे मीच, अगदी शेवटी हुरहूर लावणारी गोष्ट आहे. खरंतर कुणीतरी हीच गोष्ट शिरोडकरची म्हणून लिहायला हवी. मी नक्की वाचेन.
सध्या एकंदरित पुस्तकांचा दुष्काळ आहे. आईला सध्या मासिकं वाचायचं वेड लागलंय म्हणून पुस्तकं बंद. आमच्या लायब्ररीत सगळी इंग्लिश पुस्तकं आहेत. परवाच हिटलरच आत्मचरित्र आणलं. ओ की ठो कळत नाहीये. म्हणजे एक लाईन तीन तीन वेळा वाचल्यावर कळतंय त्याला काय म्हणायचंय ते. खरंतर फिलॉसॉफीचं पुस्तक वाटतंय ते. एवढा मोठा (आणि छोटाही) माणूस, ओरॅटर पण लेखन एकदम सपक वाटलं. की ही भाषांतरकाराची किमया? थोडं थोडं त्याचं म्हणणं पटलंसुद्धा. आपण नाही का युपी बिहार मधून आलेल्यांच्या नावाने शंख करत?
महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा बायो डेटा अपडेट करून टाकला. बघुया कॉल येतात का ते? जेपींना सांगितलं, तर ते म्हणाले कशी तुम्ही आजची मुलं, दोन वर्षात नोकऱ्या बदलता? त्यांनी फक्त एकाच ठिकाणी नोकरी केली आणि शेवटी कंपनीने नारळ दिला. असुदे, प्रत्येकाच्या निष्ठा असतात. त्यांची तिथे. आईला पण तिच्या कंपनीत वीस वर्ष होऊन गेली असतील. गमतीत आम्ही म्हणतो सुद्धा, बरेच चेअरमन आले आणि गेले पण त्यांची सेक्रेटरी एकच आहे वीस वर्ष. विन्या फक्त म्हणाला, ताई बदल बदल, नोकरी बदल, लोक बघ कुठे कुठे अमेरिका, युरोपला जातायत. तुलाही नक्की चान्स मिळेल.
खरंच मिळेल? म्हणजे एकटीने राहायचं, स्वतः सगळं मॅनेज करायचं. मदतीला आई नाही, सल्ला द्यायला बाबा नाहीत, खोड्या काढायला विनय नाही. माझा डेस्क नाही, मैत्रिणी नाहीत आणि....तोही नाही. ग्लॅमरस आहे पण तितकंच घाबरवणारं.
हं, कदाचित ह्याच्यामुळेच मला उदास उदास वाटतंय
11 comments:
Ataa matr ha kharach typical story form karnyachaa praytanaa sarakha vatayala lagalaay. ani tyatala adhicha natural freshness haravun jatoy.
are/aga ashu,
mag me kasa lihayla hava? me kahich special karit nahi. ani me suruvat kelyapasun kahi changeahi kela nahiye.
pan eka arthi barobar aahe. nava manus bhetala, ki pahilyanda interesting vaTata, mag rojachach zalyavar kaay? roj mare tyala kon rade? asa kadachit mazya hya blog chya babatit hot asel.
dar athavadyala lihinyacha prayatna karate. ata dar athavadyala kay interesting ghadaNar? je hota te lihite, tyamule kadachit hot asel.
ani afterall its my story. It can be anyone's story because I am someone very ordinary and very next door type, tyamule ha blog pahilyapasunach boring honar asa mala vaTat hota, to thoda ushirane vhayala lagalay.
me kharach kahi change kela nahiye so called shaili madhe karan majhi kahi shailich nahiye. tyamule ha freshness haravanyacha bhag atiparichayd avadnya type cha asava.
anyway, thanks for your comment. i will try. but i dont know how...
-Sam
Samvaadini,
reading your blog for the first time - so, I guess I am still experiencing the "freshness" - ekdam mast lihites tu!
ekdam simple aani agdi next-door-type - mhantes tasa!
believe me - its very difficult to maintain this.
aapan blog lihito mhanje kahitari varcha class, bungaat, amazing lihaaylaa paahije - most of us (including me) - suffer from this curse :)
have just read a couple of your earlier posts - liked them a lot!
keep writing. hope to be a regular reader from here on.
~ketan
चांगलं लिहीतेयेस तू, आधीही लिहीत आलीयेस, आणि ह्या पोस्टमध्येही मला काही खुपलं नाही. वाचकांना काय आवडेल ह्याचा विचार करून लिहीण्या ऐवजी सध्या लिहीते आहेस तसं जे जसं घडतंय तेवढंच लिही. तुलाही बरं वाटेल, आणि वाचकवर्गाच्या अपेक्षा ही लिमिट मध्ये रहातील. त्या अपेक्षांना खतपाणी घातलं की ते ओझं डोईजड होतं आणि त्याखाली दबून मोडून आपण ब्लॉगिंगच थांबवतो - असं खूपदा घडलंय. तेव्हा येणाऱ्या कॉमेण्ट्स कडे दुर्लक्ष करून स्वत:च्या आनंदासाठी लिहीत रहा. कोई वाचो या ना वाचो! :)
केतन आणि सर्किट म्हणतोय ते अगदी खरं आहे संवादिनी. blog हा आधी स्वत:च्या आनंदासाठी लिहावा. खरंतर वर इतकं एक्स्प्लेन करत बसण्याचीही तुला गरज नव्हती. छान लिहिते आहेस आणि मनापासून लिहिते आहेस आणि आम्हाला ते आवडतय.
त्या मिशीवाल्याचं पुढे काय होतय त्याची उत्सुकता लागलीय बर्का तेव्हां लिहून टाक लवकर.
एवढ्या मोकळेपणाने लिहीलेली अनुदिनी मी प्रथमच वाचतो आहे. मी सुद्धा मनात कितीही इच्छा असली तरी एवढ्या मोकळेपणाने लिहू शकत नाही. त्यामुळेच ही एकमेव अनुदिनी मी आता नियमीतपणे वाचणार आहे.
http://kathanavyatha.blogspot.com
संवादिनी, तू तुला हव तसच अन हव तेच लिहीत रहा. खूप मस्त लिहीतेस तू, आणि मी तर अगदी मरुन आहे तुझ्या लिखाणावर :) सर्किट, केतनला माझही अनुमोदन. ट्यूलीप म्हणते तस स्वतःच्या आनंदासाठी लिखाण कराव. तेह्वा, लिखते रहो :)
आणि परवा चक्क तू माझ्या ब्लॉगवर येऊन अभिप्राय नोंदवलास!!! काय मस्त वाटल ग मला!! एकतर मला तुझ लिखाण भलतच आवडत (२ दा सांगितल, म्हणजे पहा बर किती आवडत ते!) आणि तूच माझय ब्लॉगवर आलीस चक्क!! मन सानंद आनंद डोलल अगदी!!! :) आता पुढची पोस्ट कधी म्हणे??? लवकर येऊदेत.
Chan lihilays ekdam.. Kahi freshness haravala biravala nahiye..
Keep it up.. :)
Ani ho navin job milala ki sang nakki.. :)
Hi ! Love reading your blog - connects me to my 'marathipan', which i lost when i left mumbai and the country quite a few years back. The language and its words weave sepia - tinted memories of old friends, relatives and places. A pity (actually a clamity!) i can barely speak a word of marathi with anyone here ;-)
Pls keep writing in your girl-next-door style. For nostalgia value, it beats hands down all those countless Indian newspaper I read on the net daily!
शिवाय नुसतंच विशेष लिहिलं तर त्याचं वैशिष्ठ्य ते काय उरणार? काही गोष्टी धो धो हसवतात, काही गालातल्या गालात - म्हणुन एक भारी आणि दुसरी बुरी होत नाही.
वाचणारे बदलतात, तशाच त्यांच्या आवडीनिवडी - प्रत्येकालाच satisfy करता येत नाही आणि तसा प्रयत्न करशील तर तुझ्या लेखनात तुला तू दिसणार नाहीस.
तुझ्यासारखं सरळ साधं नि बिनचुक लिहायचा मी वर्षानुवर्षे प्रयत्न करतोय पण मला ते जमत नाही...:(
किसका क्या और किसका क्या....
@ केतन - हं. पटलं. काही उच्च लिहिण्याची गरज असली तरी माझ्याच्याने तसलं काही लिहिलं जाणार नाही, मला आपलं एवढंच बरं आहे.
@ क्षितिज, पराग - तुमच्या कमेंटबद्धल फार फार अभारी आहे.
@ सर्किट - तुझं म्हणणं पटलं. अपेक्षांचं दडपण मलाही जाणवतंय, पण खरंतर ते तसं व्हायला नको. पण दडपण येणं सहाजिक आहे. सगळ्यांनाच येत असणार. मलाही येतंय.
@ ट्युलिप - जेव्हा पुढची अपडेट होईल तेव्हा नक्की लिहीन. सध्यातरी मिशीवाला आणि त्याची नको असलेली मिशी एकदाही दर्शन देत नाही आहेत. माहिती काढायची पण काही सोय नाही. बघुया.
@ यशोधरा - अगं तुझ्या कमेंटनी मलाही अगदी सानंद आनंद डोलल्यासारखंच वाटलं. You made my day that day...
@ SM - आपली कमेंटही मनाला भावली. आपण इतकी छान कमेंट लिहिता, मग ब्लॉग का नाही लिहीत. आम्हला वाचायला खूप आवडेल आणि तुमचा मराठीशी टचही राहील.
@ अभिजित - छान हरभऱ्याच्या झाडावर चढवतोस हं. तुझा अत्ताचा पोस्ट वाचला. कमेंट करण्याआधी पुन्हा दोन तीनदा वाचावा लागेल असं दिसतंय.
Post a Comment