Thursday, June 5, 2008

ते तिघं आणि आम्ही तिघं

मिळतं ते नको असणं आणि नसलेलं हवं असणं हा मनुष्यप्राण्याचा स्वभावधर्म आहे. मीही अमानूष कॅटेगरीतली नसल्याने, माझाही अनुभव काहीसा असाच आहे. काल नाकापर्यंत कामात बुडालेली असल्याने, एखादा दिवस बिनकामाचा आला तर किती मजा होईल असा वाटायचं, इथे आल्यापासून काही फुटकळ कामं सोडली तर तसं काहीही काम केलेलंच नाही. पहिल्यांदा मजा आली. आता त्याचाही कंटाळा यायला लागलाय. केवळ पगार मिळतो म्हणून त्या जागेत जायचं. जमेल तसा वेळ काढायचा.

सतत अनिश्चिततेची टांगती तलवार डोक्यावर. कुठे पाठवतील याची. पुणं म्हणजे, मी पुण्यातच राहीन हा जो माझा गैरसमज होता तो पूर्णपणे मावळलाय. म्हणे पुण्यात काही प्रोजेक्टस नाहीत. जास्तीत जास्त काम बेंगलोर, हैद्राबाद आणि चेन्नईला आहे. तिथेच बहुतेक जावं लागेल. रोज एक नवी बातमी. एकदा साहेब म्हणाले, अमेरिकेला जाशील का सहा महिने? पण आल्यावर सहा महिने चेन्नईला राहावं लागेल? ठीक म्हटलं. तिथे बायो डेटा पाठवला. क्लायंटने रिजेक्ट केला. मग युरोपातला एक प्रोजेक्ट होता. तिथलं काही कळलं नाही अजून. मग म्हणाले आठवडाभर दिल्लीला जाशील का? म्हटलं जाते. तिथूनही होकार आलेला नाही. एक आखातातला पण प्रोजेक्ट आहे, तिथेही नंबर लावून ठेवलाय माझा. रोज ती धाकधूक घेऊन ऑफिसात जायचं आणि नो न्यूज इज द बेस्ट न्यूज म्हणत घरी जायचं. खूप चिडचिड व्हायला लागलेय हल्ली.

आणि ह्या सगळ्याचा त्रास माझ्यापेक्षा आनंदला जास्त होतोय, कारण मी एवढं डोकं खाते त्याचं दिवसभर की विचारू नका. त्या दिवशी असंच झालं. भयंकर वैतागले होते. त्याला म्हंटलं, माझ्याबरोबर चल जरा. तर नाही म्हणाला. त्याचंही बरोबर आहे त्याला कामं असतात. तो बाकावर नाही. माला जरा रागच आला. तावातावाने आनंदीला फोन केला. तिचं ऑफिस जवळच आहे. साधारण पाच वाजत आलेले ती नक्की भेटेल असं वाटलं तिला फोन केला, ती उचलेना. खूप चिडचीड झाली.

मी थोडावेळ आनंदची वाट पाहिली, तो मिटींगमधून बाहेर पडण्याची काही चिन्ह नव्हती. वैतागून एकटीच खाली उतरले. म्हटलं सरळ सिनेमाला जाऊन बसू. म्हणून निघाले खरी. पण एकटीनेच कसं जाणार? बाजूला कोण असेल? नसत्या शंका यायला लागल्या. स्कूटरवर बसले खरी, पण जायचं कुठे हा मोठा प्रश्नच होता. म्हटलं बालगंधर्व ला जाऊन बघावं. तिथे गेले, तर तिथंही काही खास नव्हतं. चालत चालत संभाजी पार्कात गेले.

तिथे नेहमीची संध्याकाळ चालली होती. कुणी फिरायला आलेले, कुणी प्रेम करायला आलेले, आणि कुणी माझ्यासारखेच काहीच करायला नाही म्हणून आलेले. बसून राहिले एकटीच. लोकांना बघत. त्यांच्या मनात काय चाललं असेल त्याचा अंदाज घेत.

बघता बघता एका ग्रूपने माझं लक्ष वेधून घेतलं. तिथे चौथरा आहे ना तिथे बसले होते. चौघं होते. तीन मुलगे, एक मुलगी. त्यांच्याकडे लक्ष जाण्याचं कारण म्हणजे ते एकमेकांशी खाणाखूणांनी बोलत होते. माझं कुतुहल थोडंसं चाळवलं. मी त्यांच्या मागेच, त्यांच्याकडे पाठ करून बसले. ते एक अक्षरही बोलत नव्हते. खाणाखूणा आणि मध्येच एखादी ग्रंट. हळूहळू ते मुकबधीर आहेत हे मला समजलं. आणि ते काय बोलत असतील ह्याच्याविषयी माझ्या मनात प्रचंड कुतुहल निर्माण झालं.

गम्मत बघा. त्या बिचाऱ्यांना, ज्यांना बोलता आणि ऐकता येतं, ती लोकं काय बोलत असतील, ह्याचं कुतुहल नेहेमीच वाटत असेल. आणि आज त्यांच्या बाजूला बसून माझीही परिस्थिती तशीच झाली. पण माझी पाठ त्यांच्याकडे होती आणि त्यांच्या खाणाखुणा मला दिसत नव्हत्या. मी मध्येच मान वळवून बघायचा प्रयत्न करीत होते. आणि त्यांच्यातल्या त्या मुलीशी पटकन माझी नजरानजर झाली. ती हसली. मीही हसले. मला एकदम ऑकवर्ड वाटलं. का कुणास ठाऊक पण मी वळले आणि चक्क त्यांच्याबाजूला जाऊन उभी राहिले. ती तिघंही माझ्याशी खाणाखुणांनी बोलायचा प्रयत्न करीत होती आणि मीही. नकळत मी त्यांच्यात कशी रमले मलाच कळलं नाही. ऐकू येत असूनसुद्धा आजूबाजूचं काहीही ऐकू येईनासं झालं. फक्त त्यांचे फेशिअल एक्स्प्रेशन्स. हातवारे एवढंच.

थोड्या वेळानं त्यांची जायची वेळ झाली. बहुदा ते तिथे भेटतात बऱ्याच्दा असं त्यांना सांगायचं होतं. निटसं कळलं नाही. मीही त्यांना पुन्हा विचारलं नाही. पण एक वेगळंच जग होतं त्यांचं. बोलता येत नाही, ऐकता येत नाही, पण हसता येतं, खिदळता येतं. खाणाखुणा करता येतात. लिप मुव्हमेंटस वरून समोरचा काय बोलतोय ह्याचा अंदाज घेता येतो.

एकदम मला बाबाची खूप आठवण झाली. तो काय म्हणाला असता हे पाहून? सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत?

जिला देवाच्या कृपेने, चांगलं गाणं म्हणता येतं ती मी, माझ्या क्षुल्लक समस्या घेऊन किती चिडचिडी होऊन तिथे गेले? आणि डोंगराएवढ्या समस्येचं ओझं डोक्यावर घेऊन जगणारे ते तिघं. त्यांना गाणं कधीच म्हणता येणार नाही असा शाप देवानं दिलेला, पण गाणं म्हटल्यासारखं आयुष्य जगत होती. हसत होती, एकमेकांची चेष्टाही करीत होती, अगदी माझ्यासारखं किंवा इतर कुणाहीसारखं आयुष्य जगायचा प्रयत्न करीत होती.

मी तिथेच बसून राहिले बराच वेळ. एकटीच. मोबाईल वाजायला लागला. आनंदचा होता. तो खूप सॉरी म्हणाला. मीही आढ्यतखोरपणा दाखवला नाही. आनंदीचाही फोन आला. ती म्हणाली, तीही पार्काजवळच आहे. ती आली. आनंदही आला. नेहमीच्या थट्टा म्हस्करीला ऊत आला. आमच्या तिघांच्या.

मी हसत होते, बोलत होते, पण मनात मात्र घर करून राहिले ते तिघं, अगदी घरी पोचेपर्यंत.

- संवादिनी

18 comments:

केसु said...

काय सही आहे नं ? काल माझी पण प्रचंड चिडचिड झाली ऑफिस मध्ये. सगळी संध्याकाळ, म्हणजे खरे तर दुपारनंतरचा सगळा वेळ बिन कामाचा गेला. सारख वाटत होतं , चायला आपण काय करतो आहोत इकडे टाइमपास, उगाच कुठून येउन पडलो इकडे. मग शांतपणे डेस्क वर जाऊन बसलो अणि सहज शिवकल्याणराजा ऐकला। मग कळि खुलली. अशा छोट्या छोट्या गोष्टी मधून आनंद हुडकणारे प्राणी बघितले की मग आपल्या रडण्याची आपल्यालाच लाज वाटते.

Unknown said...

awdla post.. kharach lok khup adachanit asunahi anandat jagtat.. ani apanch kadhi kadhi ase vagto na!! tujhya tari dokyat atta kahi prashn ahet.. maz tar var var pahta sukhat challay.. pan ek diwas assa yeto na, nusti chidchid n vaitag vatto ! ani mag he sagla dhirani ghenari, majet asnari mansa pahili ki kamal vatte..
tya tighanna nasel ka chidchid hot? kiti problems yet astil..
neways.. as usual sanvadini ch post pahun yeyy zale !! :D

Anonymous said...

hya goshtichi ji koni heroin ahe ti CA ahe na? mag itaki anishichitata ka tila 'sosayala' lagtey? aah dubai udya delhi parwa europe ashi dar dar chi Thokre ka khatey tumchi heroin? nidan bharatat tari CAs na bharpur choice ani scope ahe jar te nikkame nastil. samvadini tumhi story lihitana facts barobar ahet ka tapasun paha jara ha ek anahut salla.

a Sane man said...

tula vegLa sangayla nakoch tarihi...'jiyo'!

@ anonymous,

hee "story" aahe?...asel tar aso baapaDi...paN asalya tapashilant kiti adakaycha...mage Tulip mhanali hoti WSBD (White space black dot) syndrome tashich vatali tumachi pratikriya...

Anonymous said...

Mala asa watatay ata ki tula kasalataree CompleX aahe ani tulasuddha asa watat asel ki you r not gud enough
Tujha complex kadachit tujhi identity as an extraordinary kahitari lihinyachi, tula far chaltey. Tula asa ka watata ki tu far starr asalyasarkha...jara khali utar...put your feet on the ground..and take that head out of the clouds. World is not enough ..be logical..and be smart (smart <> oversmart).

Meghana Bhuskute said...

@ऍनॉनिमस १
सीए लोकांना भारतात काम आहे की नाही, हा मुळात मुद्दाच नाहीय, हे तुमच्या लक्षात येतं आहे का? आपल्या आयुष्यातली अनिश्चितता किती सापेक्ष असते, ते सांगण्याचा प्रयत्न करतेय ती.

@ऍनॉनिमस २
कुणाला वाटतंय आपण स्टार असल्यासारखं? संवादिनी की ए सेन मॅन? त्याचं कारण कळेल का?

@ए सेन मॅन
WSBDला 'छिद्रान्वेषीपणा' असा मराठी शब्द चालेल का रे? मी सहमत हे सांगायला नकोच!

@संवादिनी
नेहमीप्रमाणे सहज-सुंदर-जबरदस्त.

Anonymous said...

Me(d)gha Tai,

Aho me tumchyasarkha social worker nahi. Tya intellectual property (Anonymous 1 war) me comments ka taku?? Ka kunas thawook...majhi pan chid-chid asahya jhali ha blog wachlyawar. Ani tumhi ugach judd shabd ka waparata?? (Wajan is not proportional to the Judd shabd...phukatach exhibition ...)
Ata pudhe tumcha reply nakoy mala. Gapp pane wacha ani shant basa. Je kahi lihaycha asel te aplya blog madhe liha.

kalawe,
Lobh naheech tumcha...
pudhe pan nasawa.

केसु said...

मला वाटते, प्रश्न हे सगळ्यांनाच असतात. मुद्दा हा आहे की आपण त्याच्याकडे बघतो कसे? त्या तिघाना चिडचिड होत नसेल असे नाही, प्रश्न नसतील असे नाही. कदाचित ते आपल्यासमोर आले नाहीत.

हा सगळा प्रश्नप्रश्न खेळ मी गेले कित्येक वर्ष खेळतोय, म्हणजे कॉलेज पासून. पण एकाही प्रश्नाला स्वतःला समाधानकारक उत्तर का नाही सापडत? दुसर्याना खुश करण्यापेक्षा आपल्या प्रश्नान्चीच उत्तरं आपल्याला किती आनंद मिळवुन देतात हे नाही का महत्वाचे? अणि नेमके तिथेच गाड़ी अड़ते. काय कारण असेल उत्तर न सापडण्यात, की हुडकण्यात? आळशीपणा की आणि काही? असो, याच्यावर बरेच लिहिण्यासारखे आहे. पण घाण्याला जुम्पलेल्या बैलाला choice नसतो. काम करावेच लागणार. बघू, weeekend ला वेळ मिळाला तर एक मस्त पोस्ट टाकेन.

संवादिनी धन्यवाद. तुझ्या पोस्टमुळे माझा एक प्रश्न सुटतोय. मी लिहायचा गेले कित्येक महिने प्रयत्न करतोय, ४-५ महिने झाले. आता मजा येते आहे. कदाचित आता मी सतत विचार लिहू तरी शकेन. छान वाटतंय. Thanks ! :)

Unknown said...

samwdini, i guess u shud not allow anonymous comments on your blog..!

सर्किट said...
This comment has been removed by the author.
Sneha said...

sam kay chalu aahe he...
mala fakt itakach sangavas vaatat tila je vatel te ti lihin...aani jyanna vaachaayach aahe tyanni te vaachav... tumache salle ki koni kay lihav aani kas he swatparyantach thevaave...
amhi lihanyachaa ithe prayatna karat asato mokal manatal kahitari mokal karanyachaa.. to sukhane karun dyavaa
ऍनॉनिमस. ignor them pls....


tu lihit rahaa



...Sneha

Satish said...

good one samvaadini... :)

Samved said...

Hi संवादिनी, मुड खराब असताना हे पोस्ट वाचलं आणि refreshing soda-lime पिल्यासारखं वाटलं. मजा आ गया.
पण नंतर कॉमेन्ट सेक्शनला आल्यावर एक्दम चिडचिड झाली. अभिजीत म्हणाला तसं "विकृत" प्रवृत्ती सगळंच नासवत जाताहेत. creative critism हा वेगळा असतो. You pl put ON comment approval procedure immediately

Abhijit Bathe said...

आई-शपत - रटाळ टेस्ट मॅच पाचव्या दिवसाच्या दुपारी रें रें रें करत चालली असावी आणि अचानक एकाच ओव्हरमध्ये चार विकेट पडुन अंपायर्सची एकमेकांत मारामारी व्हावी - असलं काहीतरी वाटलं कमेंट्स वाचुन. :))

एनीवे - पोस्ट वाचुन (म्हणजे ’त्या तिघांबद्दल वाचुन) परवाच पाहिलेल्या सई परांजपेंच्या ’स्पर्श’ बद्दल लिहावं का याचा विचार करत होतो - पण may be later.

संवादिनी - आता anonymous आणि इतरांचे वाद रंगणार आणि त्याचे शिंतोडे तुला भोगायला लागणार. I guess your honeymoon (as a writer) is over! :-(
Try not to let this break you. And believe it or not - this will make you stronger. I guess this is the time when people will (try to) snatch - what they think is their share of the cake. Its interesting to see how you fight for it.

Anonymous - dude, you had a point in your first comment! (but then again, the answer would have been that this is not a story and real lives do not go according to a script/trend). Also you lost all my sympathy by writing an "anonymous" comment.

संवादिनी - लढ!
(People - let her).

Tulip said...

वाईटच आहे हा प्रकार. संपूर्ण दुर्लक्ष कर संवादिनी आणि लिहित रहा!

Jaswandi said...

Hey Sam.. Hi!
aaj khup diwasani online ale ani lagech tujha blog ughadun vachala...

as usual sahich lihilays! :)

Dk said...

Great work!! really :)
कोणी काय करावे ते मी सांगण्या इतपत मोठा नाही, तरीही संवादिनी, एकच कर लिहित जाच. (जाच ह्या शब्दाचा दुसरा अर्थ काढु नकोस :) ) मी आता ठरवलय, ऍनॉनिमस कॉमेण्ट्स मी तरी करणार नाही. ( ह्या आधीच्या पोस्तात १ दाच केली होती.) बाकी हे जे काय चाललय ते चालुदे हिंमत नाही आहे त्या/ ती च्या मध्ये! Waited for your post for so long, finally went through & felt good! Now got net will write my stuff though not good/attractive like yours but will try somthing...

A good 1 liner:
"Be quiet in the office... ...respect the fact that others sleep!"
Anonymous ( hey means don't know the writer... ) :)
Keep smiling B +

Nandan said...

vareel non-anonymous pratikriyanshi sahmat. Durlax kar aani lihit raha. Pratyek velee comment lihili nahi tari tuza naveen post pahila kee nakki vachato. I am sure, mazyasarakhe anek lok aahet.