गेल्या शुक्रवारी सकाळी उत्साहाने ब्लॉग उघडला. मला एक निकटचा वाटलेला अनुभव ब्लॉगवर टाकलेला. वाटलं वाचणाऱ्यांना तो आवडेल. ब्लॉग आवडला अशा काही कमेंट्स येतील. हावरटपणे सकाळी ब्लॉग उघडून पाहिला. कमेंट्स वाचल्या. आणि खूप वाईट वाटलं. अगदी मनापासून.
आपण सगळेच का लिहितो? का वाचतो? आपल्याला आपल्या लिहिण्यातून आणि वाचनातून काही आनंद मिळतो म्हणून. माझ्या ब्लॉगवर मला वाटेल तसं, मला सुचेल तसं लिहिता यावं, माझ्या कुवतीप्रमाणे म्हणून हा ब्लॉग सुरू केला. माझ्या लिखाणाची उडी सरड्याप्रमाणे कुंपणापर्यंतच आहे हेही माहीत होतं. मग तरीही का लिहायला सुरवात केली? कारण आपली जी गोष्ट आहे ती कोणत्याही आडपडद्याशिवाय सांगावी. कठीण वाटलं हे करणं, म्हणून स्वतः पडद्याआड राहायचं ठरवलं.
सुरवातीला प्रतिसाद चांगला मिळाला. माझा हुरूपही वाढला. दर आठवड्याला लिहीत गेले. सुरवातीला दर आठवड्याला दाद देणारी मंडळी हळूहळू बाजूला झाली आणि ते अपेक्षितही होतं. कारण आहे काय हो माझ्या ब्लॉगमध्ये मी सोडून? ना कलात्मक भाषा, ना सृजनशील विषय. बऱ्याच वेळा मी लिहिलेलं मला स्वतःलाही आवडलं नाही, तर इतरांनी त्याला दाद द्यावी ही अपेक्षाच चूक आहे. त्यामुळे कुण्या एका मुलीने केलेली स्वयंकेंद्रित बडबड कितीशी आकर्षक असणार? आणि कोण ती वाचणार? ज्यांना ती आवडली नाही त्यांनी अगदी आवडली नाही असं जरी लिहिलं असतं ना, तरीसुद्धा वाईट वाटलं नसतं. कारण तसा हट्ट कधीच नव्हता.
पण गेले काही आठवडे जे चाललंय ते मला स्वतःला फार अस्वस्थ करणारं आहे. केवळ मी पडद्याआड राहणं पसंत करते, म्हणून मी कुणीतरी खोटारडी आहे, लोकांना फसवायला मी इथे असं करते, अशा प्रकारच्या काही तिरक्या कमेंट्स आणि इ-मेल्स मला यायला लागले. पहिल्यांदी मी हे हसण्यावारी नेलं. पण प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढतंच चाललंय आणि ह्या कालच्या कमेंट्स म्हणजे त्यावरचा कळस झाला.
तुम्हाला वाटत असेल ना, मी हे जे लिहितेय ते खरं घडलेलंच नाहीये, सगळं काल्पनिक आहे. तर तसं समजा. लिहिलेलं वाचून पाच मिनिटं करमणूक तरी होते ना, तेवढी करून घ्या आणि सोडून द्या. मी कोण? मला पडद्याआड राहायला का आवडतं? आणि तसं मला आवडतं म्हणजे मी खोटारडी, असे विचार आणि आरोप कृपया करू नका. ह्याचा खूप त्रास होतो. मनापासून सांगतेय. तुम्हाला अतिशय क्षुल्लक वाटूही शकेल पण मला होतो.
जसं कुणी म्हणालं की एखादा सीए निकम्मा असेल तरच त्याची अवस्था माझ्यासारखी किंवा ह्या ब्लॉगमधल्या हिरॉइनसारखी होईल. म्हणजे मी माझ्या मनातली काही सल सांगितली, त्याची किंमत शून्य? वर मीच खोटारडी. मी सीए नाहीच आणि मला सीए लोकांच्या प्रोफेशनल लाईफ बद्दल काहीच माहीत नसल्याने मी मारलेली थाप पचली नाही अशा आशयाची कमेंट माझ्याच ब्लॉगवर?
बरं कमेंट्स मॉडरेशन वर ठेवणं माझ्या स्वतःच्या तत्त्वात बसत नाही. मला आवडेल ते पब्लिश करायचं आणि मला न आवडेल ते दाबून टाकायचं ही ठोकशाही झाली. आणि आपण सर्वच जबाबदार व्यक्ती आहोत. लोकं जबाबदारीनं नोंदी करतील अशी अपेक्षा ठेवणं काही चूक नाही. काही लोकांनी सुचवलं की कमेंट्स मॉडरेशनवर टाकाव्यात. पण त्रास कमेंट लोकांना दिसल्यावर नाही होत. त्रास ती कमेंट मी जेव्हा पहिल्यांदा वाचते तेव्हा होतो. ती इतर वाचतात की नाही हा मुद्दाच गौण आहे.
ज्यांना संवादिनी पटली त्यांचे आभार, ज्यांना ती नाही पटली त्यांचेही आभार. वाचणाऱ्यांचे आभार, न वाचणाऱ्यांचेही आभार. न चुकता कमेंट्स टाकणाऱ्यांचे आभार, तुम्हा सगळ्या ब्लॉगर्सचे आभार, कारण खूप चांगलं चांगलं वाचायला मिळालं. अगदी रोजच्या आयुष्यातले व्हावेत असे तुम्ही सगळे जण झालात. माझ्यासाठी भांडलातसुद्धा. भरून पावले. असाच लोभ इतरांवर ठेवा. फक्त उद्या कुणी माझ्यासारखं पडद्यामागे राहून लिहायचं ठरवलं तर त्यांना खोटारडे ठरवून, त्यांच्यावर संशय घेऊन, तुमच्यापासून दूर ठेवू नका, तोडू नका. एवढीच विनंती.
धन्यवाद!
- संवादिनी
22 comments:
Sanvadini,
Tu mhante te kharech khup pattay mala.Mala ter ase vatte aplyala vatte tase apan karave lokanchi tama ajibat balgaychi nahi.Lok kai ga he kar mhanta ani tehi kar mhantat.Ase mhanatat na "ekave janache ani karave manache".
Tyamule tu pls lihit ja
kai aste na pratek gost mood ver depend aste ga
jar mood changla asel na ter ekahdi vait gost sudha aplayala avdte pan mood changla nasel ter agdi sundar ashi kalakrutipan manala khatkete.
Tyamule pls lokankade lakshya n deta tu apli lihit ja...
Tuzya adhichya senetecemule mala vatle ki tu ata lihnar nahis.
pan mazi ek request ahe aplyala avdte mhanun aplya bhavna tu mokya karat ja amhi ahotch vachayla....
ani pratikriyachi tama n karta.
i have a suggestion (and i'm sure u'll get many more) - if u dont want to put comment moderation since u believe that ppl will comment with responsibility - u can disallow 'anonymous' comments. let ppl stand up and own up wot they say by signing in with their gmail ids.
keep writing.
Samvadini, I agree tula khup tras jhala asel comment vachun pan tya comments mule please tu lihna thambvu nakos. Aplya gharasamor jar koni kachra anun takla tar apan kay ghar sodun jato ka?
Ek mast pati lavun takaychi "Yethe kachra taku naye" ;)mhanje comment moderation...Ketan agdi barobar mhanala..let ppl own up what they say.
Ultimately choice tujha ahe.akhir BLOG hai aapka :)
Pranam,
I strongly feel, you should not give up. You have your own style and natural approach to write. Comments may disrupt the flow. But I believe you should come back with double force rather than committing a double fault. (Federer chi second serve pan katheen aste khelayala.) Sometimes those comments and bloggers are full of baloney. But no one expects double ton in every Test.
Don't let that comment get your goat. Be smart and keep posting.
Regards,
Anonymous2
Sam m wtng 4 ur next post...
...Snehaa
हे पोस्ट वाचल्यावर आधीचे पोस्ट आणि त्यावरच्या प्रतिक्रिया वाचल्या. हा प्रकार दुर्दैवी असला तरी नवा नक्कीच नाही. त्या प्रतिसादांमध्ये म्हटल्याप्रमाणे मनोगतसारख्या संकेतस्थळांवर असे प्रकार नियमितपणे होत असतात. किंबहुना त्याच कारणासाठी मी मनोगतावर लेख लिहीणे थांबवले. या प्रकारात विशेष म्हणजे ऍनॉनिमसच्या बुरख्याखाली लोकांना आपण काय वाट्टेल ते करू शकतो असे वाटायला लागते.
यावर उपाय म्हणजे Monsuir K ने सुचवल्याप्रमाणे ऍनॉ. प्रतिसाद डिसएबल करणे. अनुदिनीचा हा फायदा असतो की इथे तुमचे राज्य असते. तुम्हाला वाटले तर प्रतिसाद रहातो नाही वाटले तर उडवून टाकता येतो. अनुदिनी म्हणाजे तुमचे घर आहे. तुमच्या घरी येऊन कुणी त्रास द्यायला लागला तर सरळ दार बंद करा. पण म्हणून घरात रहाणे सोडायचे नाही. आपले घर आपण बांधलेले असते. त्यातली सजावट, त्यात काय असावे यासाठी मेहनत घेतलेली असते. एका माथेफिरूमुळे घरात रहाणे सोडून दिले तर कसे चालेल?
We are all with you. So take the necessary precautions and don't stop writing.
संवादिनी -
लिहाय़चं कि नाही यावरचं तुझं मत (निदान या पोस्टपुरतं तरी) संदिग्ध आहे. आणि शेवटी काय करायचं हा तुझा प्रश्न. चांगल्या वाईट अनुभवांशिवायही लिहायचं कि नाही असा प्रश्न पडु शकतो - but its up to you.
As far as I am concerned, I would be disappointed if you give up. The ridiculous thing is, people are still writing these anonymous comments! Their support of you does not mean anything since they are not owning up to that either!
Also - you might find this harsh but - तुला काय वाटलं होतं कि नविन नविन लेखनाच्या आणि प्रतिक्रियांच्या गुदगुल्या अव्याहत चालु रहातील? well, like it or not, but welcome to the big boy's club! :))
Either you will give up now - and I wont be surprised if you do, or you will learn to ignore - both the critics and the so called supporters.
लिहायचं कि नाही याच्याएवढाच कुणासाठी लिहायचं हा ही मुद्दा महत्वाचा असतो. मध्यंतरी "आपण का लिहितो" यावर लिहायची लाट आली होती. मला तेव्हाही ती भंकसगिरी वाटली होती आणि अजुनही वाटते - याचं कारण मला तो प्रश्न बिनमहत्वाचा वाटतो असं नाही, तर जेव्हा पणाला काहीच लागलेलं नसतं तेव्हा असा वांझोटा प्रश्न स्वत:ला पाडुन घेणं अगदीच academic होतं (असं माझं मत). आणि आपण कितीही गप्पा मारल्या कि आपण स्वत:साठी लिहितो - तरी ते ही पूर्ण सत्य कधीच नसतं. त्यामुळे "आपण का लिहितो?" हा प्रश्न तु स्वत:ला 'आता' विचारणं आवश्यक. (आणि त्यावर तुला जी उत्तरं मिळतील - ती समजुन घ्यायची लायकी तुझ्याव्यतिरिक्त कुणाचीच नसेल).
आणि शिवाय या प्रश्नावरही नि:संदिग्ध उत्तर मिळेल असं नाही. (infact नक्कीच मिळणार नाही). नफा-तोट्याचा हिशोब मांडुन, जबरा नफा किंवा जबरा तोटा catagory मध्ये गेलीस तर लिही. ५०-५० मध्ये दम नसतो. तसं करुन नुसत्या inflation मध्ये स्वत्व गळत जातं. एवढं करुनही "is it worth it?" हा प्रश्न उरतोच. तु CA, म्हणजे हिशोबांबाबत तु व्यावसायिक. शिवाय तुझी analytical skills ही माझ्यापेक्षा बरीच चांगली दिसतात - त्यामुळे I am sure you can make that call.
Good night and good luck.
Purn pane secure ani protective life jagalya mule .. reality face karayachi takada kami zaliye baki kahi nahi ...
koni hi yeil kahihi lihil mhanun kay zaala tyancha tyancha maat ani tya comments tar unreasonable ani evadha mahatwa denya sarkhya tar ajeebat nahiyet ...
cool down relax and enjoy the real world come out of ur protective gudy gudy life this is the chance
And I liked your all the posts you write very very good.
But life is not always fun and reasonable ...
संवादिनी, खास तुझ्यासाठी ही कृती लिहीत आहे.
एक गेंडा घे. त्याला मस्त पाण्यात धू, पुसून कोरडा कर आणि त्याला सोलून काढ. त्याच्या कातडीचा झकास ड्रेस शिवून घे.
कुठलाही फेमस मॅन म्हणजे सुपर, स्पायडर दिसला की त्याला पकड आणि आधी तो मुखवटा काढून घे
आता हा हमखास उपाय. तुझे डुप्लीकेट पकडून आण आणि त्यांचं ब्रेनवॉश करुन त्यांना पटव की ते ही तुच आहेत. एकदा मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर झाला की परिस्थिती नुसार वेगवेगळ्या लोकांना प्रसंगांत उभं करायाचं.
मुली, घर सोडून एकटं राहाण्याची हिंमत केलीस आणि भुक्कड प्रसंगात गळून जातेस? आणि तू लिहीलेलं कुणी वाचतं म्हणजे तुझ्यावर उपकार करत नाही rather वाचणारयावरच तुझे उपकार आहेत की तू लिहीतेस. त्यामुळे काकूळतीला वगैरे अजिबात येऊ नकोस.
ह्म्म.. तुला वाईट वाटणारच.. मलाही वाटलं असतं, एस्पेशिअली प्रोफ़ेशनबद्दलची कमेंट कुणी केली असती तर.. असो.. वरच्या सगळ्यांच म्हणणं पटलं..
शिवाय अनामिक राहून भुक्क्ड अर्थहीन कमेंट्स करणार्यांसाठी इतकं मोठ्ठ पोस्ट लिहीण्या ऐवजी छान ’तुझं’ पोस्ट आलं असतं तर जास्त आवडलं असतं!! dont pay them attention! they dont deserve it..
Hey look it is (whether to write or not) absolutely your decision, still I'd say:
"Language isn't only means a of communication, it's also a method of creating a bond within a group which you have created here already!"
"Envy arises out of one's own sense of inadequacy. If you want to level with someone, there are two ways of doing the same. 1: you rise up & become as tall as the other person or else put him/her down to your level. Obliviously the easier route is the preferred option with most people. Anonymous is of that category."
"Often in simple things of life, we think that a task has no future whatsoever. A single thought like this overpowers all wits & beliefs & urges us to concede defeat, but this is the time when we most need to go ahead & not quit."
"Often people hesitate to talk to people, to make the first move.( you know who are these..)Despite feeling the need of a friend, we see several people who bury their feelings & emotions, & suffer alone. Everyone needs someone by their side who can e called a friend - a confidante."
"Hate is the emotion which consumes most of our energy, time & patience. Though it is easier said than done, accepting people as they are & forgiving them is the first step towards strengthening our mind. For a great person once has said, Forgive your enemies, nothing annoys them so much."
Hey, liked the suggestions of Samved & also agree with Abhi.
"Snakes aren't neutral "
Keep writing B + :)
Sorry! Due credit has been given to the anonymous authors. :)
क्षुल्लक गोष्टींचा किती उहापोह! उगाच शक्ति वाया घालवतेयस!
Please do not get upset.
Bloggers who reads your blog may not necessary write comments everytime. That does not mean they are away from your blog.
We write blogs just because we have to say something and not for what others are interested in reading.
You must ignore those commnets.
Please continue your good work.
If you are upset why don't you sing yaman raga someother time as you did mentioned in one of your post earlier , which will sooth you.
Smile.
एवढ्या सगळ्यानी एवढे काहि लिहिले आहे... कि आता लिहायला काहि उरले नाहि.
तुझ्या पुढ्च्या पोस्टची वाट पहात आहे.
It's one Anonymous versus many readers which like your posts.
Now it's up to you to decide.
All the best. :)
sam - lihit rahaa please. thaaMbawU nakosa.
--Nandan
All I got to say to you is : Write only for the joy of writing. And let nothing else come between you two.
Sam, tu ashi kadhich vatali navhatis... ji ekhadya anonymous chya bolnyacha swatahla tras karun gheil!
lihit raha! nahitar kachara depo pashi yeun tula shodhun kadhun lihayla lavin! :)
me vachate tuza blog nehmich... tu lihit raha... tuzyasathi... tuze lekh vachanaryansathi.
ani ho tika karnaryansathi hi, karan te hi vachatatach na tuze lekh..tyashivay tika kashi karata yeil. Tevha tu lihich :)
तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. खरंतर गेल्याच्या गेल्या शुक्रवारी मी हा पोस्ट लिहिला होता. त्यात अजून एक उतारा होता, ज्यात मी लिहिणं बंद करीत आहे असं लिहिलं होतं. फक्त रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेत तर नाही ना? असं वाटल्यामुळे ते पोस्ट तसंच ठेवलं आणि गुरुवारी पब्लिश केलं. अर्थात तो उतारा काढून टाकायला मी विसरले नाही, कारण दोन तीन दिवसातंच मी कुणासाठी लिहिते आणि म्हणून मी कुणासाठी थांबावं ह्या विषयावर माझं मत पक्क झालं होतं.
फक्त ह्या प्रकरणातून मी एकच शिकले आहे, की पडद्याअअडून ब्लॉग लिहिणं वेगळं आणि पडद्यामागे राहून इतरांच्या मैत्रीची अपेक्षा करणं वेगळं. ब्लॉग लिहिणं चालू ठेवतच आहे, पण संवादिनीचं पर्सोनिफिकेशन करायचं नाही असं ठरवलंय. ऑर्कूट प्रोफाईल बंद करायची आहे. डिलिट कशी करायची हे कळत नाही. इतरांच्या ब्लॉगवर कमेंट करणं तर कधीचंच बंद केलंय. तेवढं समजून घ्या. तो माज आहे असं समजू नका.
बाकी आता सगळं उत्तम आहे. नवा भिडू नवं राज्य सुरू झालं आहे.
हम्म्म्म्, हा ब्लॉग मी ऑलमोस्ट जेव्हा सुरू झाला तेव्हापासून वाचतोय. . .तू भावनाप्रधान आहेस हे लक्षात आलंच होतं पण म्हणून इतका त्रास करून घ्यायचा?
लोक दुतोंडी असतात. . .thats the fact. . . अभिजीत म्हणतो त्याप्रमाणे वेलकम टू द बिग गाईज क्लब. . . ह्यातूनच शिकायचं असतं. . .लोक बोलतात - त्यामुळे ते काय विचार करतात हे तरी कळतं. . .दुनिया सप्तरंगी आहे असं म्हटलं तरी त्यात आठवा काळा रंग भरपूर आहे. . .कोण काय बोलतंय याला खरंतर शून्य महत्व आहे. . .लोक गेले उडत. . तू 'तू' आहेस, स्वत्व जास्त महत्वाचं आहे. . .
उगाच स्वत:ला त्रास करून घेऊ नकोस. . .आयुष्यात पुढे जाण्यासाठी या कॉमेंटस् च महत्वाच्या आहेत. . .त्या पचवून उभी रहा. . आत्मविश्वास वाढेल. . .ओर्कुट प्रोफाईल डिलीट करणे वगैरे. . .नॉनसेन्स. . .पोरी असंच करत असतात. . थोड्या दिवसांनी परत नवीन प्रोफाईल उघडणार. . माझ्या मैत्रिणींपैकी कित्येकांचं हेच चाललेलं असतं. . .आयुष्य इतकं गोड गोड नसतं. . .हे तुला यामुळे कळले हे ही नसे थोडके. .
कमॉन चिअर अप. . .दुप्पट उत्साहाने लिहायला लाग. . .कात टाकणे यालाच म्हणतात. .काय?
अमित
संवादिनी,
मी ह्या ब्लॊग वरचे सगळॆ लेख वाचलेत. लेखन खूपच च्हान व भावनाप्रधान आहे. सर्व लेख आवडले. तुम्ही थांबू नका. व. पु. काळे यांचं १ वाक्य खूप च्हान आहे. "As you write more and more personal, it becomes more and more universal".
टिका करणारे खूप असतात, त्यांच्याकडे दुर्लक्श करा. "हाती चले बीच बज़ार कुत्ते भोके हजार".
अनिकेत.
Post a Comment