Thursday, January 22, 2009

मी एक पँडोरा?

पँडोरा. एक अतिशय सुंदर स्त्री. जगाला वेडं करण्याची सर्व अस्त्र तिला मिळालेली. पण तिची निर्मितीच मुळी झाली होती जगाला वठणीवर आणण्यासाठी, मानवजातीला शिक्षा म्हणून. एका स्त्रीकडे असायला हवेत ते सगळे गुण तिच्याकडे होते आणि एका स्त्रीकडे असायला हवा तो एक अवगुणही. प्रत्येक गोष्टीबद्दलची उत्सुकता.

तिला पुरुषांना घायाळ करण्याची सर्व अस्त्र तर मिळालेली, पण त्याबरोबरच मिळाला एक हंडा. तिला बजावण्यात आलेलं की काहीही झालं तरी ह्या हंड्याचं झाकण उघडायचं नाही. पण तिची उत्सुकता शिगेला पोचली. तिचा संयम सुटला आणि तिने तो हंडा उघडला. आणि चमत्कार झाला. मनुष्यजातीला जेरीला आणणारी रोगराई, त्रास आणि वाईट गोष्टी, ज्या मानवाला तोपर्यंत माहीतही नव्हत्या, त्या हंड्यातून बाहेर पडल्या. तिला तिची चूक समजण्याआधीच व्हायचं ते नुकसान झालं होतं. तिने झटकन हंड्यावर झाकण ठेवलं आणि शेवटची एक गोष्ट मात्र हातची जाऊ दिली नाही. ती म्हणजे "आशा".

काल सहज विकिपीडिआ चाळत असताना पँडोराज बॉक्स वर पोचले. पँडोराज बॉक्स मधल्या पँडोराची ही गोष्ट.

एका वरदानाबरोबर मिळालेला एक शाप. अनिश्चिततेचा आणि सरतेशेवटी कुठल्याही संकटातून वर काढणारी, यायाला मदत करणारी आशा. निर्गुण, निराकार, निरंकार, अगदी परमेश्वरासारखी असावी अशी आशा. आज त्याच्यासमोर सीसीडी मध्ये बसलेले असताना, त्याच्या बोलण्याकडे बिलकूल लक्ष नव्हतं. मनात सतत पँडोराच घोळत राहिली. माझे हरवलेले डोळे कुठेतरी काही शोधत राहिले त्याच्या डोळ्यात. आयुष्याला दिवाणं बनवणारी सगळी सुखं समोर हात जोडून उभी आहेत पण त्याबरोबर पेलावं लागणारे अनिश्चिततेचं शिवधनुष्य.

कदाचित मी फारच निगेटिव्ह वगैरे विचार करणारी असेनही, पण आपल्या समाजात नक्कीच मुलीला लग्नानंतर ह्या अनिश्चिततेला सामोरं जायला लागतं. तो भेटून फार काळ नाही झाला. आणि प्रत्यक्ष भेटण्याच्या वेळा तर दोन हातांच्या बोटावर मोजता येण्यासारख्या. तेवढ्यात काय कळणार खरं काय खोटं काय? माझं जजमेंट अगदीच वाईट नाहीये. त्याच्याबाबतीत ते चुकणार नाहीही. पण त्याच्यासोबत येणाऱ्या त्याच्या जगाचं काय?

पण शेवटी काहीही झालं तरी त्यातून सावरण्याची आशा ही माझीच आहे. माझी स्वतःची.

- संवादिनी

9 comments:

अनामिक said...

>>> पण शेवटी काहीही झालं तरी त्यातून सावरण्याची आशा ही माझीच आहे. माझी स्वतःची.

मला वाटतं आपण वाईटातून सावरतो, त्यामुळे इथे 'सावरणे' हा शब्द जरा खटकला.... तेव्हा तुझी 'आशा' ही तुझ्याबरोबर उत्तमोत्तम घडण्याची असावी असे वाटते!

अनामिक

अनिकेत भानु said...
This comment has been removed by the author.
U2ISolutions said...

welcome back - koham

Abhijit Bathe said...

तु हे पोस्ट आधी तुझ्या ब्लॉगवर टाकलेलंस का? मला पहिले ३ (आणि कदाचित ४) पॅरेग्राफ्स आधी वाचल्यासारखे वाटले....

Sneha said...

mala ek kalat nahi sam.. itaki unsecure ka hotes.. lagn ha baal aahe n all i knw.. pan mala vatat goshtila avghad mhatal ki tya adhikach avaghad hotat ga..

संवादिनी said...

@ अनामिक - मला "सावरणे"च योग्य वाटतं. ह्याचं कारण काही वाईट घडलं तर त्यातून मी सावरू शकेन ही माझी अशा. वाईट घडलंय किंवा घडेलंच असं मला म्हणायचं नव्हतं. किंबहुना घडण्याची शक्यता आजच्या तारखेला अजिबात दिसत नाही. पण निगेटिव्ह विचार येतातच ना? ते मांडायचे कुठे? ब्लॉगवर.

@ अनिकेत - तुझा मेल मिळाला, अजून काय मनात होतं ते कळलेलं नाही.

@ निलेश - थँक्स

@ अभिजित - मागच्या पोस्टात म्हटल्याप्रमाणे मी एक नवा ब्लॉग सुरू केला होता. त्यात हे पोस्ट आणि आजचं पोस्ट टाकलं होतं. मग मन फिरलं वाटलं आधीचंच बरं होतं आता अजून नवीन एक निक नको. म्हणून तो ब्लॉग उडवला. तिथेच वाचला असशील.

@ स्नेहा - तू म्हणालीस तसंच मीही वागते. पण म्हणून मनात येणारे विचार थांबतात का? नाही? प्रत्यक्षात आपण हे बोलून दाखवत नाही पण मनात असतं. मग कुठे मांडायचं? ब्लॉगवर.

me said...

bravo!!!!!! हा निर्णय घेतला आहेस तर त्याचे परीणाम भोगण्याची तयारीही चांगली आहे!!!

Sneha said...

hmm vichar yenyache thambt nahit pan te ase ka yetat yavar v4 kar.. aapoaapach sagal badalel..

साहित्यसंस्कृती said...

पण त्याच्यासोबत येणाऱ्या त्याच्या जगाचं काय?
- jas tuz jag tuzyapasoon vegal karaN avaghaD aahe tasech tyache jaag tyachyapasoon. tyamule don vartuLe chedatana kahee sarakhe anee kahee vegale rahaNar. te sudhaa barobar ghevoon nighalat tar tumhaa doghanaa tumche ek nave jag karataa yetil.
-I like ur writing.
sakhee