Thursday, September 17, 2009

एका पावसाचे पडणे

पाऊस कधीचा पडतो
पाचूंची हिरवी पाने
मातीच्या हीनपणाला
गंधांची ओली दाने

पाऊस कधीचा पडतो
जणू पागोळ्यांच्या माळा
रुणु निळ्या घनाच्या पोटी
झुणु निषादसुंदर गळा

पाऊस कधीचा पडतो
कोरडे मात्र अंगण
स्वप्नांचे बहर बगीचे
मनी मोरांचे रिंगण

पाऊस कधीचा पडतो
मन उदास काहुर होते
मदमत्त वातस्पर्शाने
तनी उसनी हुरहुर होते

पाऊस कधीचा पडतो
पाऊस पाडुनि जातो
पापण्या ठेऊनि ठाक
तो डोळे भिजवुन जातो

4 comments:

अनिकेत वैद्य said...

पाऊस किती दिवसात फ़िरकला नाही,
पाऊस कुणाला कधीच कळला नाही,
पाऊस रुतुचे निमित्त करून दिसतो,
पाऊस पापणीआड कधीचा असतो.

कवी : सुधीर मोघे.

समीक्षक said...

कविता बरी आहे. काही कल्पना आवडल्या, जसे की मातीला मिळणारा सुगंध वगैरे. खालील ओळींचा अर्थ समजला नाही. पण अर्थ समजला नाही म्हणजे कलाकृती उत्तम असे म्हणणाऱ्यातील मी नसल्याने ते थोडेसे सविस्तर सांगावे.

रुणू निळ्या घनाच्या पोटी
झुणू निषादसुंदर गळा


तसेच मदमत्त वातस्पर्शाने हे जरा कसेसेच वाटले बाकी प्रयत्न उत्तम

Sneha said...

mi kho dilay bagh ga

Abhi said...

khupach chan lihile aahe!!!