Wednesday, October 5, 2011

देवयानी (22)

दरम्यानच्या काळात मी याहू चॅटवर जायला लागले. प्रथम उत्सुकता होती म्हणून आणि मग व्यसन लागलं म्हणून. खरं सांगायचं तर ह्या चॅट साईट्ससारखी दुसरी टुकार जागा नाही. त्यातही केवळ शारीरिक गरजा इतरत्र भागत नाहीत म्हणून त्यासाठी तिथे येणारे महाभागच अधिक. पण मला तिथलं काय आवडलं तर सेंटर ऑफ अटेन्शन होणं. लोकं तुमच्या भर भरून मागे लागतात बोलण्यासाठी शंभरातले नव्याण्णव जरी टुकार असले तरी एक चांगली व्यक्ती बोलायला मिळाली तर वेळ बरा जातो. मुळात माझ्यासारख्या पूर्णपणे एकट्या पडलेल्या मुलीसाठी हे खूपंच छान होतं. बरं आपण काय बोलतो, कसं बोलतो, कशाबद्दल बोलतो ह्याचं काही बंधन नव्हतं. तुमच्या बोलण्यावरून लोक तुम्हाला जज करणार नसतात आणि तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही बोलणं सोडून त्या माणसाला अगदी इग्नोरही करू शकता.

हळू हळू मी तिथे गुंतत गेले. जितकी जास्त गेले तितकी जास्त गुरफटले. पुन्हा पुन्हा जाऊ लागले. एका मुलाशी बरेच दिवस बोलत होते. तो खूप चांगला वाटला. मोठ्या कंपनीत नोकरीला, पगार चांगला वगैरे वगैरे. आम्ही एकमेकांना एकमेकांचे फोटोही पाठवले. त्याच्याकडे व्हिडिओ कॅम होता त्यावर मी त्याला पाहिलं. एकमेकांशी आम्ही व्हॉईस चॅटवर बोललो देखील. त्याने माझ्याकडे माझा नंबर मागितला. मीही थोडे आढे वेढे घेऊन त्याला दिला. मला त्रास होईल असं काहीच तो करणार नव्हता ह्याची मला खात्री होती. एक दिवस त्याने मला भेटूया का म्हणून विचारलं. मीही हो म्हटलं.

वेळ ठरवून आम्ही भेटलो. तो जसा वाटला होता तसाच होता. छान. एकदा भेटलो, दोनदा भेटलो, तीनदा भेटलो. फोन आणि चॅटतर रोजचंच झालं होतं. आपण कोणत्या माध्यमातून भेटलो ह्याचं भान माझं थोडं सुटत चाललेलं होतं. श्रेया आणि प्रीतमला मी हे सगळं सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडून चिडवा चिडवी चालू असे. अजूनतरी माझं त्याच्यावर प्रेम वगैरे नव्हतं. पण मी त्यापासून खूप दूर होते असंही नाही.

बोलता बोलता एकमेकांची खूप ओळख झाली विश्वास वाढला. पावसाळा चालू होता, वातावरण छान कुंद असायचं. फोनवर बोलता बोलता त्याने एकदा प्रश्न टाकला. लोणावळ्याला जाऊया विकेंडला? दोन दिवस जाणं मला शक्य नव्हतं आणि असतं तरीही मी काही एकट्या त्याच्याबरोबर ओव्हरनाइट जाणार नव्हते. हो नाही करता करता शेवटी शनिवारी माथेरानला जायचं ठरलं. दस्तुरीला गाडी लावून आत चालत जायचं आणि परत बाहेर चालत यायचं आणि संध्याकाळी घरी परत. बेत छान होता. माथेरान माझी खूप आवडती जागा आहे. रोमँटिक. लाल रस्ते, छड्या, घोडेवाले, आणि झाडांचा हिरवा रंग.

दिवस मोठा मजेत गेला. आम्ही मनसोक्त गप्पा मारल्या, भरपूर मजा केली. अगदी कॉलेजच्या पिकनिकला खेळतात तशा गाण्याच्या भेंड्याही खेळलो. दिवस मावळतीला झुकला तसे आम्ही माघारी फिरलो. असं दिवसभर खूप मजा केली की संध्याकाळी एक वेगळीच हुरहुर लागते, तसं काहीसं झालं होतं. पाय दुखत होते, दिवस संपला होता, परत रोजच्या रामरगाड्यात परत जायचं होतं. आम्ही दोघंही शांत होतो.

अचानक तो मला म्हणाला, देवी तू मला आवडतेस. काय बोलावं मला सुचेना. मलाही तो आवडत होताच पण असा एक्सप्रेस होकार द्यायची माझी तयारी नव्हती. मी काहीच बोलले नाही. पण त्याने मला तसं निरुत्तर राहू दिलं नाही. अखेरीस मीही मान्य केलं की तोही मला आवडतो. अख्खा दिवस आम्ही एकत्र होतो पण चुकूनही त्याने मला स्पर्श केला नव्हता. त्याने त्याचा हात माझ्या हातावर ठेवला आणि माझा हात हातात धरला. एक क्षण मला अनुरागचीच आठवण झाली. सगळं सगळं आठवलं आणि मी त्याचा हात झिडकारला. त्याला नक्की काय झालं ते कळलं नाही. मग आम्ही एकमेकांशी काहीही न बोलता गाडीत जाऊन बसलो.

तो गाडी सुरू करणार इतक्यात मी त्याला थांबवलं. अनुराग बरोबर जे काही झालं होतं ते मी त्याला अजून सांगितलं नव्हतं. अथ पासून इति पर्यंत मी त्याला सगळं सांगितलं. सगळं शांतपणे ऐकून घेतल्यावर तो म्हणाला की एवढं टेन्शन घेऊन नकोस, हल्ली सगळेच तसं करतात, आपणही करू. मी विचारात हरवले होते, माझी तंद्री लागलेली होती. त्यानं पुढं वाकून माझ्या ओठावर त्याचे ओठ टेकवले तेव्हाच मला ते समजलं. तो क्षण मी वर्णन करू शकत नाही इतका किळसवाणा होता. एका क्षणात मनात कित्येक विचार येऊ शकतात पहा. मला स्वतःचीच किळस वाटली, कीव वाटली, वाईट वाटलं, त्याचा राग आला. मी माझ्या मनातला एक दुखरा कोपरा त्याच्यापुढे उघड केला आणि त्याला त्याचं काहीच नव्हतं. आपणंही करू? व्हॉट द फक?

असो, मी तशीच गाडीतून उतरले जी पहिली टॅक्सी उभी होती तिच्यात बसले आणि नेरळ स्टेशनला आले. ट्रेनने घरी आले. एकदाही तो मागे आला का हे पाहिलं नाही. पुन्हा त्याला फोन केला नाही, चॅट केलं नाही, मेलही नाही. हे सगळंच फार वाईट होतं. पुरुष हे असेच असतात आणि त्यांच्याकडून ह्यापेक्षा चांगलं काही अपेक्षितंच नाही का? असं वाटायला लागलं. रात्रभर रडत राहिले.

- देवयानी

10 comments:

Anonymous said...

Were you really so naive?

CHETAN said...

Hi kay bolav te kalena pan sarvach ase nastat.
tumhi j kelat te yogyach hote.
atachya jagat lagechach konavarhi vishwas theu naka. aniway thanks 4 sharing ur exp
CHETAN, PUNE

Dr. Prashant said...

premat aakanth budun ekhada kshan aaplya watyala yene yasarkhe sukh nahi,
tasech prem panghrun tasa kshan aaplya aayushat aanu pahnara aaplya watyala yenyaevdhe dusre dukkh nahi.. devi feeling sorry for u.. prem shodhu naye g, tyalya phakt aaplya aayushat yeu dyawe..

Anonymous said...

hmm.. right... happens.. :(...

Reshma Apte said...

oh shit WTF

hummm kharach eka khanaat aapala mhanun mokal whav tar dusarch kshan aavaghadavanaara,,, man mokal karav tar sharir maganaara ,,,

jyach tyanach face karu jaane ,, he kara te karu naka chuk barobar ase kahi ansat i think je ghadal te ghadal ,,,

pan mag pudhe?? dhakka pachavala kasa?

Reshma Apte said...

oh shit WTF

hummm kharach eka khanaat aapala mhanun mokal whav tar dusarch kshan aavaghadavanaara,,, man mokal karav tar sharir maganaara ,,,

jyach tyanach face karu jaane ,, he kara te karu naka chuk barobar ase kahi ansat i think je ghadal te ghadal ,,,

pan mag pudhe?? dhakka pachavala kasa?

Anonymous said...

या बायकांचा हाच प्रॉब्लेम आहे. सुखाची अपेक्षा ठे वणे म्हणजे वाईट तुमच्या भावना ऐकून घेणे दिवसभर टच न करणे छान. सो पथेटिक. ग्रो अप यार. शरिराचे आकर्षण देवानेच निर्माण केले आहे. तुमच्या सौंदर्याला भाळून एखादा जवळ आला तर लगेच तुम्ही अश्लील शरिर मागणारा वगैरे असली विशेषणं लावता. अशा भावना निर्माण करणारा देव पण अश्लील का? असो. विमेन इन थिस कंट्री नीड टू ग्रो अप. सेक्शुअल मॅचुरिटी फार कमी वाटते त्यांची.

देवयानी said...

anonymous, i never reply back to comments on this blog, but this one i need to. i totally understand getting together physically. but there is time and place for everything. its different with guys. guys want sex and sex and sex and maybe love happens. girls need love love love and then sex. when girl is thinking of love and boy proposes sex, nothing else would happen in any damn part of the world. and assuming that i did this with someone else, so i would be ok to do with him when he wants where he wants is basically MCP type. that was more disgusting than mere his wanting physical gratification.

Reshma Apte said...

anonymous
are u trying to justify what boys wants?

physical attraction kiti age paryant rahate? bayakancha hach problem, ya deshatalya bayaka .. khotya naitikatet adakalelyaa n all ghisi piti shit ,,, physical attraction i agree its very natural but as devayani correctly said only sex sex sex all the time without thinking about place and time ... its really pathetic

Anonymous said...

देवयानी, अपवादात्मक परिस्थिती उत्तर दिल्याबद्दल आभारी आहे. त्यापेक्षा संयत प्रतिसाद दिल्याबद्दल जास्त आभारी आहे.मुलींची बाजु समजू शकतो पण सगळे पुरुष शेवटी तसलेच अशा प्रकारे जनरलाईज करतात बायका ते मला पटत नाही. मुलं सेक्स पासून वंचित राहिली नसती तर कदाचित त्यांनी असं सेक्स सेक्स केलंही नसतं.
रेश्मा ताई, हो मी मुलांना जस्टिफाय करतोय. ते काही बलात्कार करत नाही. एका गोष्टी साठी विचारतात जी की नॅचरल आहे. पुरुषांना जनरलाईज करु नका. सतत सेक्स सेक्स असं नसतं. मी बायकोची मनस्थिती ठीक नसते तेव्हा तिला आग्रह करत नाही. काही वेळा १ महिनाभर सुद्धा. असो प्रोब्लेम मुलींचा किंवा मुलांचा नसून आपण या गोष्टी कडॆ पाहतो कसे या मानसिकतेचा आहे. ते म्हणजे वाईट. घाणेरडे कृत्य अशी शिकवण घोकत मुली लहानाच्या मोठ्या होतात. जेव्हा वेळ येते ह्या शिकवणीचे बोजड साखळदंड त्या बाजुला काढू शकत नाही म्हणून त्यांच्या लेखी ते दुय्यम बनते. आकर्षण किती दिवस टिकते हा फार छान प्रश्न होता. जो पर्यंत टिकते तो पर्यंत तरी ते खुल्या मनाने उपभोगता आले पाहिजे.