Wednesday, April 6, 2011

Hi

नमस्कार, संवादिनीचा गेला post वाचला. first reaction होती की makes no sense. पण जरा विचार केला आणि मलाच ही कल्पना आवडली. एखादा कट्टा किंवा चावडी असावी, तसा हा blog. मनात असाही विचार आला की तिच्या ब्लॉगवरून कशाला लिहा, आपलाच नवा ब्लॉग काढला तर? पण जर कुणी ready viewership देत असेल तर ती का नाकारा?

माझा स्वतःचा blog आहे आणि मी लिहिलेलं वाचणारे लोकंही आहेत. पण जे तिथे लिहिता येत नाही ते, अगदी मनातलं, खोलवरंचं, खुपणारं (खुपते तिथे गुप्ते मध्ये मला कधी बोलावणार? ) ते लिहावं म्हणून इथल्या शाळेत admission घेतली. संवादिनीने (मला माहीत आहे तुझं नाव शमा आहे किंवा सुषमा आहे, पण तुला संवादिनी सोडून दुसरं काहीच म्हणावंसं वाटत नाही. खरंच!) परवानगी दिली आणि here I am.

pen name आहे देवयानी. देवयानी का? मी शाळेत असताना ययाती वाचलं. तेव्हा वाचलेली देवयानी अगदी ठसलीच मनावर. मुलं म्हणतात ना हल्ली, मुली जाम attitude दाखवतात. ते attitude मला देवयानीत कुठेतरी दिसलं. तेव्हा पक्कं वाटायचं, शर्मिष्ठा चांगली, सभ्य, marriage material. पण आपल्याला बा देवयानीसारखं व्हायचं. चुका करायच्या, पण मनस्वी करायच्या.

तसं काही झालं नाही. खरं तसं शर्मिष्ठा किंवा देवयानी किंवा यती किंवा ययातीही खऱ्या आयुष्यात होणं कठीणच आहे. फार फार तर कच होणं त्यातल्या त्यात सोपं. पण blog वर काहीही होणं एकदमच सोप्पं आहे. म्हणून हे नाव घेतलं. ह्या नावात एक romanticism आहे. कचासाठी बापाशी भांडणारी, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी आणि त्याने विश्वासघात केल्यावर चक्क त्याला विसरून ययातीच्या प्रेमात पडणारी देवयानी अद्भुतच नाही का?

आता ययाती तसं पुसटसंच आठवतं. पुन्हा वाचायचा प्रयत्न केला तर शब्द लागत नाहीत. खोटं कशाला सांगा, मी पुन्हा वाचायचा प्रयत्नच केला नाही. काळ बदलतो तसे आपणही बदलतो. तशी मीही बदलले. स्वतःला आरशात पाहिल्यावर, डोळ्याला चस्मा लावू adolescent वयात ययाती वाचणारी, दोन वेण्या घालणारी, पुस्तकातला शब्दन शब्द घासून घासून पाठ करणारी, वेडी गबाळी मी होते ह्याच्यावर विश्वासच बसत नाही. कुठेतरी हा प्रवास romantic होता. (बरोबर मराठी शब्द आठवत नाही, पण ह्या romantic चा प्रेमाशी काहीही संबंध नाही. काव्यमय चालेल का? कवित्व वरून? ) खडतर आहे. फार काही special नाहीये, पण माझ्यासाठी super duper आहे. अर्थात अर्धवट आहे, पुढचा रस्ता invisible आहे. मागे जाणं अशक्य आहे. एकंदरीत सगळं confusing आहे.

त्या सर्वाची संगती लावायचा हा एक वायफळ प्रयत्न.

- देवयानी (1)

6 comments:

Abhijit Bathe said...

ब्लॉगवर इतर कुणाचा कंटेंट असणे ही फार नवी कल्पना नाही. गणेश मतकरी चे लेख रेग्युलरली ’सिनेमास्कोप’ ब्लॉगवर छापले जातात. तो ही आपलेपणे आलेल्या कमेंट्सला उत्तरं वगैरे देतो. ब्लॉगवर एकापेक्षा अधिक लोकांनी लिहिण्याचे प्रयोगही पुर्वी झालेले आहेत. मी सर्किट आणि ट्युलिप बरोबर एक ब्लॉग चालवायचो. पण संवादिनीची ही कन्सेप्ट मला कळली नव्हती. कळेल म्हणुन वाट पाहिली पण हे पोस्ट वाचुन गुंता आणखीनच वाढलाय. एकतर ब्लॉग हा एक इतका वैयक्तिक प्रकार आहे २-३ लोक म्हटले तरी गर्दी वाटते. ४ लोकांचा प्रयोग म्हणजे - मेघना, संवेद, ट्युलिप आणि निमिष ने चालवलेलं ’रेषेवरची अक्षरे’. पण तिथेही एक ’कोहेरंट प्रॉडक्ट’ बाहेर पडायला जीव दिले आणि घेतले जातात. ’चालवायला देणे आहे’ प्रकार चालेलही, आणि चालोही. पण कल्पना सुचवणाऱ्या संवादिनीनेच प्रकल्प मार्गाला लावायला हवा. सिस्टिम सेट होण्याआधीच कन्सेप्ट हायजॅक
झाल्यास मेजर झोल होतात.

संवादिनी said...

अभिजित,

तू म्हणतोस ते खरं आहे. मी चालवायला देणे आहे लिहिलं तेव्हा मलाही नक्की काय करायचं ते माहीत नव्हतं. पण नंतर संकल्पना स्पष्ट होत गेली.

मी पुर्वीही अनेकदा लिहिलं आहे, की मला ब्लॉग हे माध्यम आवडलं. जे वैयक्तिक आहे, ते वैयक्तिक असण्याच्या मर्यादा ओलांडून लिहिण्याचं साधन म्हणून मी ह्या माध्यमाकडे पाहिलं. लिखाणाची आवड किंवा सराव असल्या काही बोजड संकल्पना माझ्या डोक्यात नव्हत्या अजूनही नाहीत.

पण जे काही मी लिहिलं ते लिहिताना आणि ते लिहिलेलं लोकांनी वाचताना, आणि त्या अनुभवांची सांगड कुठेतरी दुसऱ्या कुणाच्या आयुष्याशी लागलेली पाहताना मजा आली. पण अताशा मला स्वतःला तो आनंद मिळत नाही. पण इतरांना हा आनंद नक्कीच घेता येईल.

कल्पना एकदम सोपी आहे. माझ्या आणि देवयानीच्या बोलण्यातून खरंतर मलाही ही संकल्पना स्पष्ट झाली. हा कट्टा आहे म्हणा ना, किंवा कंफेशन बॉक्स असतो चर्चमध्ये तसं काही आहे समजा. गुडूप पिंजऱ्यात बसून बोलून टाका काय बोलायचंय ते. बोलल्याचं समधान मिळेल, वाचकांना ऐकल्याचं समाधान मिळेल, पण ह्यापुढे गोंधळ वाढता कामा नये.

प्रत्यक्षात आणणं थोडं कठीण आहे. कारण आपल्या ह्या ब्लॉग वर्ल्डमध्ये देखील खूप हाणामाऱ्या, पॉलिटिक्स चालत असतं. जेव्हा तुम्ही ब्लॉगवरचा स्वतःचा अधिकार सोडता, तेव्हा ह्या सर्वाला सामोरं जायची तयारी हवी. ती मी दाखवली आहे. परत मी लिहिणार आणि वाचक ह्या बाईच्या ब्लॉगला मिळणार असंही वाटणं शक्य आहे. पण वाचक हा लिखाणाला, अनुभवाला असतो, ब्लॉगला नसतो, ही मॅच्युरिटी दाखवणारा लेखकही हावा. ती मॅच्युरिटी देवयानीनं दाखवली.

शेवटी हा प्रयोग आहे. ह्या प्रयोगाची चळवळ व्हावी अशी आम्हा दोघींचीही इच्छा आहे. संवादिनी ही व्यक्ती न राहता माध्यम व्हावं अशी इच्छा आहे. यशस्वी किंवा अयशस्वी होईल हे आताच सांगता येणार नाही. नियमही आताच घालून देता येणार नाहीत. ते उपजतील ह्या सर्वांतून. पण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे?

Samved said...

संवादिनी, लोकशाही आहे, ब्लॉगही तुझा आहे तेव्हा तुझं स्वातंत्र्य हा चर्चेचा विषय नाही. या गृहीतकावर पुढं-
१) गणेश मतकरी एका ठराविक विषयावर सिनेमास्कोप वर लिहीतो- विषय हे टारगेट आहे
२) रेषेवरची अक्षरे- आम्ही (मी, निमिष, मेघना, ट्युलीप) प्रस्तावना किंवा तत्सम उपक्रम सोडला तर इथे फक्त कॉन्सोलिडेट करतो
३)तुझा चालवायला दिलेला ब्लॉग-
इथे काय दिशा, विषय, संपादन आहे?
कुणी इथे येऊन चर्चा/कट्टेबाजी/कन्फेशन्स का द्यावेत? आपापल्या ब्लॉगवर/ ग्रुपवर/ गुप्त नावावर चालवलेल्या ब्लॉगवर का देऊ नये?
ब्लॉग ही फुकट मिळालेली गोष्ट आहे. म्हणजे तू कुणाला फुकट तुझं इन्फ्रास्ट्रक्चर दिलंस असं ही म्हणवत नाही.
...हे मग नक्की काय आहे?

संवादिनी said...

संवेद,

हा कोणताही ग्रेट उपक्रम (सध्यातरी) नाही. मी बरेच दिवस काहीही लिहिलं नाही. माझ्या मुलीमुळे आता इतक्यात मी काही वेळ काढून लिहू शकेन असं मला वाटत नव्हतं, पण आपला ब्लॉग लिहिता राहावा असं मला वाटलं (कुणालाही वाटेल)
म्हणून मी गेलं पोस्ट टाकलं. त्याला प्रतिसाद मिळाला. इतकंच.

तुमच्या उपक्रमांविषयी मला काहीच म्हणायचं नव्हतं? अभिजितनं त्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे कुठल्याही उपक्रमाला स्पर्धा किंवा प्रत्युत्तर म्हणून मी करते आहे असं तुला किंवा कुणालाही वाटत असेल तर खरोखरंच तसं काही नाहीये.

दिशा, विषय, संपादन - फक्त स्त्री लेखकांसाठी, संपादक, अर्थातच मी. विषय अनिर्बंध, कारण संवाद साधण्यासाठी . देवयानी काय लिहिणार आहे हे तिनं मला सांगितलंय. मला ते आवडलंय, ह्याउप्पर तिनं अमुक शब्द किंवा तमुक वाक्य लिहावं की नाही असं संपादन मी करणार नाही. ती चांगलं लिहिते का नाही हे ठरवायचा तर मला काही अधिकारच नाही. त्यामुळे फक्त कुणाला लिहू द्यायचं इतकंच संपादन मी केलं.

इथे कुणी येऊन का लिहावं, हा खरोखरच कठीण प्रश्न आहे. मी स्वतः ह्याच प्रश्नाने साशंक होते. देवयानी म्हणाल्याप्रमाणे रेडी व्यूअरशीप हा मुद्दा असेल. कारण नवा ब्लॉग सुरू करणं आणि त्याला वाचक मिळवणं ह्या सगळ्या प्रकरणाला वेळ लागतो, म्हणून असेल, ह्या ब्लॉगवरचं (माझ्यावरचं नव्हे) प्रेम असेल. कौतूक असेल. काहीही असेल.

मुळात हा अतिशय साधा लो-की प्रयत्न आहे. बऱ्याच यशस्वी अयशस्वी प्रयत्नांपैकी एक असं समजून आपण सर्वच त्याला फार महत्व आतातरी नको देऊया.

Samved said...

बाकी चालु दे. रेषेवरची...मी फक्त एक उदाहरण म्हणून घेतलं to explain the case.

सौरभ वैशंपायन. said...

"कचासाठी बापाशी भांडणारी"

- नुसती नाही "कचा - कचा" भांडणारी :-D

----

BTW आपल्याला बुआ हा ब्लॉग आवडतो. लिहित रहा! :-)